

बीजिंग : आजारांचे वेळीच निदान होणे ही एक अत्यंत गरजेची बाब असते. लवकर निदान झाले की उपचाराची दिशा समजते व रुग्णावर यशस्वी उपचार होऊ शकतात. अशा रोगनिदानासाठी अनेक चाचण्या सध्या उपलब्ध आहेत. त्यामध्येच युरीन टेस्ट म्हणजेच मूत्र चाचणीचाही समावेश होतो. आता चीनच्या एका कंपनीने स्मार्ट टॉयलेट बनवल्याचा दावा केला केला आहे. या टॉयलेटच्या सहाय्याने मूत्र चाचणी करणे सहज शक्य होणार आहे.
या टॉयलेटमध्ये हायटेक सेन्सर बसवण्यात आले आहेत. यामुळे यूरिन सॅम्पलची चाचणी पॅथलॅबप्रमाणेच होऊ शकते. व याचा अहवाल यूजर्स त्यांच्या मोबाईलवर किंवा कंपनीच्या अॅपवर पाहू शकणार आहेत. या रिपोर्टच्या आधारे यूजर्स त्यांच्या आरोग्यविषयक सल्ला डॉक्टरांकडून घेऊ शकतात. अनेक गंभीर आजारांच्या लक्षणाबाबतही यामुळे आधीच कळू शकेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्ट टॉयलेटचा वापर घर तसेच सार्वजनिक ठिकाणीही करू शकतो. त्याचा वापर करणे सोपे आहे.
तसेच, चाचणीला अहवालदेखील कमी वेळात येतो. स्मार्ट टॉयलेट वापरकर्त्यांची सवय न बदलता त्यांचा डेटा गोळा करेल तसेच, डेटा लिक होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. चीनची राजधानी बीजिंगसह अनेक शहरात हे सार्वजनिक शौचालयात हे स्मार्ट टॉयलेट बसवण्यात आले आहेत. 'स्मार्ट युरिनल' असे त्याचे नाव आहे. या हायटेक युरिनलमध्ये डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच बिल्ड-इन पेमेंटचा पर्यायही देण्यात आला आहे.