पॅरिस : फ्रान्सच्या राजधानीत दरवर्षी अतिशय थाटामाटात नुईस ब्लँच फेस्टिव्हल साजरा केला जातो आणि देशविदेशातील लोकप्रिय, सुप्रसिद्ध कलाकार आपली कलाकृती साकारण्यासाठी येथे येतात. याच महोत्सवांतर्गत पॅरिसमधील लियोपोल्ड सेनघोर ओव्हरब्रिजला अंगठ्याच्या आकारात तयार केल्या गेलेल्या एका कलाकृतीने सजवले गेले आणि हेच आता मुख्य आकर्षण केंद्र ठरत आहे. याचे नाव रिंगडिलक्स असे ठेवण्यात आले आहे.
हे अनोखे कडे पाहण्यासाठी रोज सुमारे 10 हजार लोक भेट देतात. हा मोहक नजारा प्रत्यक्षात साकारण्यासाठी 7 कोटी रुपयांचा खर्च आला असून वास्तु कलाकार मार्क मिमरामने ही निर्मिती केली. यासाठीही त्याला सहा ते सात महिने अथक परिश्रम घ्यावे लागले. सायंकाळनंतर रिंगडिलक्स प्रकाशात जणू न्हाऊन निघते आणि हा नजारा डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक एकच गर्दी करत आले आहेत. पॅरिसमधील या फूट ओव्हरब्रिजची निर्मिती 1997 ते 1999 यादरम्यान झाली. 2006 मध्ये सेनेगलच्या पहिल्या राष्ट्रपतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ याचे लियोपोल्ड सेनघोर असे नामकरण करण्यात आले होते.