स्मरणशक्ती कमजोर होऊ नये यासाठी…

स्मरणशक्ती कमजोर होऊ नये यासाठी…
Published on
Updated on

नवी दिल्ली : वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्तीही कमकुवत होते. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे यासाठी चांगला मार्ग म्हणजे आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे.

अनेक वेळा वाढत्या वयामुळे स्मरणशक्ती कमी होते. कमकुवत स्मरणशक्तीच्या कारणांमुळे लोकांना त्यांच्या जीवनशैलीबद्दल चिंता करावी लागते. त्रासाला सामोरे जावे लागते. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला आहार घेणे आवश्यक आहे. असा आहार वेळेवर घेणेही गरजेचे आहे. स्मरणशक्ती कमजोर होऊ नये म्हणून मल्टीटास्किंग कामे कमी करावीत, असेही तज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही एकाच वेळी खूप काम करत असाल तर त्याचा मेंदूवरही वाईट परिणाम होतो. जास्त काम करण्याच्या प्रयत्नात त्यावर तणाव वाढतो. त्यामुळे स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते.

झोप न लागल्यामुळेही स्मरणशक्ती कमजोर होते. प्रत्येक व्यक्तीसाठी 7-8 तासांची झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे मेंदू दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागतो. शारीरिक व्यायाम न केल्याने स्मरणशक्तीही कमकुवत होऊ लागते. रोज व्यायाम केल्यास स्मरणशक्ती चांगली होते.स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी, दररोज 40 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news