अन् ‘स्टॅच्यू’ चोरी करून पसार झाला!

अन् ‘स्टॅच्यू’ चोरी करून पसार झाला!
Published on
Updated on

वर्सा : एरवी, चोरी किंवा दरोड्यावेळी चोर असतील वा दरोडेखोर, ते घरात, दुकानात जिथे संधी वाटेल, तिथे घुसतात आणि तेथे जे काही हाती लागेल, ते कब्जात घेऊन तेथून शक्य तितक्या लवकर पोबारा करतात. आवश्यकतेपेक्षा एक मिनिटभर थांबणे देखील त्यांच्यासाठी प्रचंड धोक्याचे असते. पण, काही चोर इतकेही साहसी असतात, जे अगदी निश्चिंतपणाने जिथे चोरी करायची, तिथेही बिनधास्त असतात आणि अगदी सहजपणे चोरी करत तेथून गायब होतात.

विशेषत: विदेशात असे अनेक किस्से घडलेले दिसून येतात. काही वेळा चोर घरात खाणे-पिणे करून त्यानंतर ऐवजासह पोबारा करतात; तर काही ठिकाणी काही चोर रात्रभर मुक्काम करून, सर्व ठावठिकाणे शोधल्यानंतरच बाहेर पडतात.

पोलंडमधील वर्सा येथे मात्र वेगळाच प्रकार आढळून आला. येथे एक चोर एका ब्रँडेड दुकानात स्टॅच्यूमध्ये जाऊन उभा राहिला आणि कोणाला शंकाही येणार नाही, इतका स्तब्ध होता. अगदी सुरक्षारक्षकांनाही त्याची शंका आली नाही. काही तासांनंतर मात्र या चोराने स्टॉलच्या आत जात चोरी फत्ते केली आणि तितक्याच बेमालूमपणे गायब झाला.

नंतर एका चोरीवर समाधान न झाल्याने त्याने नजीकच्या एका मॉलकडे मोर्चा वळवला. 22 वर्षांचा हा चोर नंतर पोलिसांच्या ताब्यात सापडला आणि त्याला तीन महिन्यांसाठी कोठडीत पाठवण्यात आले. चोरीचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला दहा वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news