नवी दिल्ली : बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लोकांना ग्रीन टी प्यायला आवडते. सामान्य चहापेक्षा ग्रीन टी शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे. पण आज आम्ही तुम्हाला ग्रीन टी नव्हे, तर ग्रीन कॉफीचे फायदे सांगणार आहोत. ग्रीन कॉॅफी गेल्या काही काळापासून लोकांची पसंत बनत आहे. ग्रीन कॉॅफी शरीरासाठी फायदेशीर आहे. या कारणास्तव याला सुपरफूडदेखील म्हणतात.
यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् असतात, ज्यामुळे शरीरातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. ज्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी आहे त्यांनी याचे सेवन करावे. ते रोग प्रतिकारकशक्ती आणि चयापचय दोन्ही वाढवते. याशिवाय हे नियमित प्यायल्याने वजनही कमी होऊ शकते. ग्रीन कॉॅफी जास्त वेळा पिऊ नये. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. हे तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा पिऊ शकता. ते जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.
ज्यामुळे लूज मोशन, अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय ग्रीन कॉॅफी प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही सेवन करू नये. ज्यांना कोणत्याही गोष्टीची अॅलर्जी आहे, त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच त्यांचा आहारात समावेश करावा; अन्यथा तुम्हाला काही गंभीर समस्या होऊ शकतात. ग्रीन कॉफीच्या बिया आणि पावडर दोन्ही बाजारात उपलब्ध आहेत. बियांपासून कॉफी बनवण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गॅसवर मंद आचेवर उकळून गाळून कोमट करून प्यावे.