जगातील एकमेव पक्षी जो मागे उडू शकतो!

हमिंगबर्ड हा जगातील सर्वात लहान पक्षी
backward flying bird
मागे उडू शकणारा पक्षी. Pudhari File Photo
Published on
Updated on

मेक्सिको : निसर्गाने आपल्याला अनेक अद्भुत आश्चर्ये दिली आहेत. त्यापैकी एक म्हणजे हमिंगबर्ड, जगातील एकमेव असा पक्षी जो मागे उडू शकतो. हमिंगबर्ड हा जगातील सर्वात लहान पक्षी आहे. त्याचं वजन फक्त 2 ते 20 ग्रॅम असतं. पण, त्याच्या आकाराइतकंच त्याचं कौशल्य देखील लक्षणीय आहे. हा पक्षी एका सेकंदात आपले पंख सुमारे 50 ते 80 वेळा फडफडवतो.

backward flying bird
सर्वात विषारी पक्षी... रबिश बर्ड!

हमिंगबर्डची सर्वात आश्चर्यकारक क्षमता म्हणजे मागे उडणे

या वेगवान पंखांच्या हालचालीमुळे त्याला ‘8’ च्या आकारात उडता येते, तसंच तो हवेत एका जागी स्थिर राहू शकतो.पण, हमिंगबर्डची सर्वात आश्चर्यकारक क्षमता म्हणजे मागे उडणे. इतर कोणताही पक्षी हे करू शकत नाही. हमिंगबर्ड आपल्या पंखांना अशा प्रकारे वळवतो की तो सरळ मागे उडू शकतो. ही क्षमता त्याला फुलांमधून मध गोळा करताना अतिशय उपयोगी पडते. तो फुलाजवळ थांबतो, मध पितो आणि मग सरळ मागे जातो.

हा पक्षी आपल्या वजनाच्या दुप्पट खातो अन्न

हमिंगबर्डची ही विशेष क्षमता त्याच्या अन्नसंकलनासाठी महत्त्वाची आहे. तो दररोज आपल्या वजनाच्या दुप्पट अन्न खातो. त्यासाठी तो दिवसभरात सुमारे 1000 ते 2000 फुलांना भेट देतो. त्याचे हृदय एका मिनिटात 1200 वेळा धडकते, जे मानवी हृदयाच्या धडकण्यापेक्षा 20 पट जास्त आहे. हमिंगबर्डच्या या अद्भुत क्षमतेमुळे तो परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. तो एका फुलावरून दुसर्‍या फुलावर जाताना परागकण वाहून नेतो, ज्यामुळे वनस्पतींचं प्रजनन होते. अशा प्रकारे, निसर्गाच्या संतुलनात हा छोटासा पक्षी मोठे योगदान देतो. हमिंगबर्ड आपल्याला शिकवतो की, आकार लहान असला तरी कौशल्य मोठे असू शकते. त्याची मागे उडण्याची क्षमता आपल्याला सांगते की, कधीकधी अपारंपरिक मार्ग स्वीकारणं, हेच यशाचे गमक असू शकते.

backward flying bird
चिंता घटत्या पक्षी संख्येची

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news