कॅलिफोर्निया : एखादा पक्षी दिसायला अतिशय सुंदर, गोंडस असतो, पण तो प्रचंड विषारीही असतो, असे सांगितले तर त्यावर विश्वासही बसणार नाही. पण, अशीच वस्तुस्थिती असून या सुंदर, गोंडस मात्र विषारी पक्षाचे नाव ‘हुडेड पिटोहुई’ किंवा ‘गिनी पिटोहुई’ असे आहे. हे पक्षी प्रामुख्याने पापुआ न्यू गिनीमध्ये आढळतात. स्थानिक लोक या पक्ष्याला रबिश बर्ड म्हणतात. कारण हा जगातील सर्वात विषारी पक्षी आहे.
बर्डस्पॉटच्या अहवालानुसार, 1990 पर्यंत हा पक्षी विषारी असल्याची कोणतीही विशिष्ट माहिती नव्हती. 1990 मध्ये प्रथमच, कॅलिफोर्निया अकादमी ऑफ सायन्सेसचे पर्यावरणशास्त्रज्ञ जॅक डंबाचेर यांनी ते विषारी असल्याचे शोधून काढले. जॅक पापुआ न्यू गिनीमध्ये या पक्ष्याचा अभ्यास करत होते. त्यावेळी एका जाळ्यातून या पक्ष्याला सोडवण्याचा प्रयत्न करताना चुकून त्यांचा हात कापला गेला आणि तीव्र जळजळ होऊ लागली. काही मिनिटांत हात सुन्न झाला. त्यांनी हाताचे बोट तोंडात टाकले. काही सेकंदातच त्यांची ओठ आणि जीभ जळू लागली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. यानंतर जॅक डंबसरला त्याने जगातील पहिला विषारी पक्षी शोधला आहे, याची जाणीव झाली.
त्याने या पक्ष्याच्या शरीरात असं काय आहे, याचा अभ्यास केला. दोन वर्षांच्या संशोधनानंतर, 1992 मध्ये तो या निष्कर्षावर आला की त्याच्या बॅट्राकोटॉक्सिन आहे, जे जगातील सर्वात घातक न्यूरोटॉक्सिन आहे जे कोब्रामध्येही असते. जे काही सेकंदात माणसाचा जीव घेऊ शकते. पिटोहुईच्या ऊती, त्वचा आणि पंखांमध्ये हे विष असते. शास्त्रज्ञांच्या मते, जर तुम्ही चुकून पिटोहुईला स्पर्श केला किंवा त्याच्या संपर्कात आला तर त्याचं विष थेट नस आणि स्नायूंवर हल्ला करते. प्रथम स्नायू सुन्न होतात. विषाचा डोस जास्त असल्यास अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हुड असलेली पिटोहुई प्रामुख्याने बीटलची शिकार करतात, ज्यांना मलेरिया बीटलदेखील म्हणतात. ते स्वतः खूप विषारी असतात.