20 हजार लोकांना बेपत्ता करणारे ‘अलास्का ट्रँगल’!

20 हजार लोकांना बेपत्ता करणारे ‘अलास्का ट्रँगल’!
Published on
Updated on

अलास्का : अलास्का ट्रँगल या जागेचे गूढ आजवर कायम आहे, ही वस्तुस्थिती आहे. 1970 पासून दक्षिणेकडील एंकोरेज व जुनोपासून उत्तर तटापर्यंत जवळपास 20 हजार लोक येथून गायब झालेले आहेत. एका नव्या डॉक्युमेंटरीत काही रहस्यमय यूएफओ पाहण्यात आल्याचेही संदर्भ आहेत. वेस स्मिथ नामक अलास्का ट्रँगलचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीने ही जागा अतिशय विचित्र असल्याचे नमूद केले. अलास्का ट्रँगलमध्ये कोणतीच वस्तू एअरक्राफ्टप्रमाणे चालत नव्हती, असे निरीक्षण वेसने नोंदवले.

जेथे वेस स्मिथने हे अद्भुत द़ृश्य पाहिले, तेथूनच 11 मैल अंतरावर अलास्कात राहणार्‍या मायकल डिलन या आणखी एका व्यक्तीने आपल्या कॅमेर्‍यात एक रहस्यमय विमान टिपले. हे विमान यूएफओप्रमाणेच होते. आता अलास्का ट्रँगलचे रहस्य केवळ आकाशापुरतेच मर्यादित अजिबात नाहीत.

या ठिकाणातून लोक कसे गायब होतात, याची कारणमीमांसा करताना येथील यूएफओ अपहरण, वेंडिंगो आणि मॅग्नेटिक एनॉमलिज जबाबदार आहेत, असे म्हटले जाते. अलास्कामध्ये काही ठिकाणी आकाशातून प्रकाशझोत पडतो, ते ही एक रहस्यच आहे. एकूणच येथे अलास्का ट्रँगलमध्ये स्पष्ट रूपाने काही तरी विचित्र सुुरू आहे, असे यूएफओ रिसर्च ऑर्गनायझेशनचे संशोधक डेबी जिगेलमेयर यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news