सर्वात महागडे मीठ

या मिठाची किंमत 250 ग्रॅमला 100 डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,651 रुपये इतकी आहे
The most expensive salt
सर्वात महागडे मीठPudhari File Photo
Published on
Updated on

सेऊल : मिठाशिवाय सगळे पदार्थ अळणी लागतात. जेवणाला चव आणणारा हा पदार्थ कमी होऊनही चालत नाही आणि जास्त होऊनही चालत नाही. आरोग्याच्या द़ृष्टीनेही मिठाचे योग्य प्रमाणातच सेवन करावे लागते. मिठाचे सागरी मीठ, खनिज मीठ म्हणजेच सैंधव असे अनेक प्रकार आहेत; मात्र जगातील सर्वात महागडे मीठ कोणते हे तुम्हाला माहीत आहे का? ‘कोरियन बॅम्बु सॉल्ट’ हे जगातील सर्वात महागडे मीठ आहे. या मिठाची किंमत 250 ग्रॅमला 100 डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,651 रुपये इतकी आहे.

हे मीठ इतके महाग असण्याचे कारण म्हणजे ते तयार करण्यासाठीची अवघड प्रक्रिया आणि या मिठाचे अनेक प्रकारचे होणारे लाभ. बांबूमध्ये हे मीठ भरले जाते आणि ते उच्च तापमानात भाजले जाते. ते भाजण्यासाठी पाईन वृक्षाचेच लाकूड वापरले जाते! जवळपास नऊ वेळा ही प्रक्रिया केली जाते. यामुळे मिठामध्ये पोषक खनिजे तयार होतात, असे सांगितले जाते. हे मीठ अँटीऑक्सिडंटस्युक्त असल्याचेही म्हटले जाते. ते शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते. हे मीठ म्हणजे कोरियातील एक पारंपरिक पदार्थ आहे. त्याला ‘जुगिओम’ असे नाव आहे. ते तयार करण्यासाठी आधी सागरी मिठाला बांबूमध्ये भरून त्यावर पिवळ्या मातीचा लेप लावला जातो. त्यानंतर हे मिश्रण आधी लोखंडाच्या भट्टीत व नंतर पाईन लाकडाच्या आगीत भाजले जाते. कोरियाच्या पश्चिम किनार्‍यावर तयार होणार्‍या मिठाचाच यासाठी वापर केला जातो. या सर्व कारणांमुळे तसेच मिठाच्या औषधी गुणधर्मामुळे त्याला मोठी किंमत मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news