Atlantic Ocean Magnetic Field Hole | अटलांटिक महासागरावर चुंबकीय क्षेत्रात मोठे छिद्र

चुंबकीय क्षेत्रातील छिद्राला दक्षिण अटलांटिक विसंगती(SAA) म्हणतात.
Atlantic Ocean Magnetic Field Hole
अटलांटिक महासागरावर चुंबकीय क्षेत्रात मोठे छिद्रSascha Pare
Published on
Updated on

लंडनः पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामधील छिद्र वेगाने विस्तारत आहे. याचा आकार अंदाजे 5 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त झाला आहे. हे छिद्र प्रत्यक्षात पृथ्वीचे कमकुवत चुंबकीय क्षेत्र आहे. यामुळे अवकाशातील किरणोत्सर्गाचे उच्च स्तर कमी उंचीवर पोहोचू शकतात. यामुळे भरातीय सॅटेलाईटस्ना याचा धोका निर्माण होऊ शकतो. डेली गॅलेक्सीच्या अहवालानुसार, हे छिद्र दक्षिण अटलांटिक महासागरावर आहे.

चुंबकीय क्षेत्रातील छिद्राला दक्षिण अटलांटिक विसंगती(SAA) म्हणतात. हे असे क्षेत्र आहेत जिथे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र बाहेरच्या दिशेने वाकण्याऐवजी आतल्या दिशेने वाकते, जे द्रव बाह्य गाभा आणि घन आवरण यांच्या सीमेवर तयार होते. युरोपियन स्पेस एजन्सीच्या स्वार्म मिशनमधील नवीन डेटा, जो पृथ्वीच्या गाभा, कवच आणि आयनोस्फीअरमधून चुंबकीय सिग्नल यांचा अभ्यास करतो, या डेटानुसार आफ्रिकेच्या नैऋत्येकडील एक क्षेत्र विशेषतः वेगाने विकसित होत आहे. हे दक्षिण अटलांटिक विसंगती क्षेत्र, जे आता 5 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त व्यापते, ते भारताच्या एकूण आकारापेक्षा 3.2 दशलक्ष चौरस किलोमीटर म्हणजेच 1.7 पट मोठे आहे. दक्षिण अटलांटिक विसंगती, कमकुवत पृथ्वी चुंबकीय क्षेत्र, उपग्रहांना किरणोत्सर्गाच्या संपर्कात आणत आहे, ज्यामुळे डेटा करप्शन, सेन्सर बिघाड आणि सेंसेटिव्हापार्टमध्ये बिघाड यासारखे धोके वाढत आहेत. हा प्रदेश अवकाशातील किरणोत्सर्गासाठी असुरक्षित बनतो आणि उपग्रहांना धोका वाढतो. युरोपियन स्पेस एजन्सीच्या स्वार्म मिशनच्या नवीन आकडेवारीनुसार, ही विसंगती वेगाने वाढत आहे आणि असममितपणे विकसित होत आहे. हे विशेषतः आफ्रिकेच्या नैऋत्य प्रदेशात स्पष्टपणे दिसून येते.

Atlantic Ocean Magnetic Field Hole
Alien sightings information | एलियनबाबत अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना होती माहिती?

सध्या, हे क्षेत्र अंदाजे 5 दशलक्ष चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे, जे भारताच्या आकाराच्या 1.7 पट आहे. दक्षिण अटलांटिक विसंगतीच्या कमकुवत चुंबकीय क्षेत्रामुळे उपग्रहांना किरणोत्सर्गाचा धोका निर्माण होतो. यामुळेच भूभौतिकीय जटिलता आणि तांत्रिक परिणाम शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. शास्त्रज्ञ या विसंगतीचा सतत अभ्यास करत आहेत, जेणेकरून त्याचा परिणाम आणि भविष्यातील संभाव्य धोके समजून घेता येतील. जर वेळीच खबरदारी आणि सुरक्षिततेचे उपाय केले नाहीत तर ते पृथ्वीच्या चुंबकीय प्रणाली आणि तांत्रिक पायाभूत सुविधांना गंभीर धोका निर्माण करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news