साप जीभ बाहेर का काढतात?

साप जीभ बाहेर का काढतात?

नवी दिल्ली : साप विषारी असो किंवा बिनविषारी, त्यांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते सतत आपली वळवळणारी, दुभंगलेली जीभ बाहेर काढत असतात. त्याचे कारण काय असते हे अनेकांना ठावूक नसते. जर एखादा साप वारंवार आपली जीभ बाहेर काढत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो आपल्या जीभेच्या सहाय्याने बाहेरील वातावरणाची चाचपणी करत असतो. म्हणजेच हे असे साप आपल्या आजूबाजूच्या परिसराची चाचपणी जिभेच्या मदतीने करत असतात. भोवतालचा परिसर कसा आहे हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सापाला ऐकू येत नाही व तो गंधाच्या माध्यमातून आजूबाजूच्या स्थितीचा, वातावरणाचा अंदाज घेतो. आपल्या आजूबाजूंच्या शिकार्‍यांची माहिती मिळवण्यासाठी साप जिभेचा वापर करतात. जिभेच्या मदतीनेच ते आजूबाजूचा वास घेतात. जेव्हा एखादा साप आपली जीभ बाहेर काढून ती हलवतो तेव्हा तो त्या जिभेच्या माध्यमातून हवेतील छोटेछोटे अगदी अतीसूक्ष्म म्हणता येईल इतके बारीक द्रव्याचे कण गोळा करतो. त्यानंतर साप ही जीभ जॅकबसन नावाच्या तोंडातील भागामध्ये टाकतो. सापाच्या तोंडातील वरच्या बाजूस हे अंग असते. सापाच्या जिभेच्या बाजूचे दोन टोकदार दात (डंख) जॅकबसनच्या 2 छिद्रांमध्ये अगदी फीट बसतात.

जीभ जशी या जॅकबसनमध्ये जाते तशी तेथील काही विशिष्ट रसायनांची जिभेवरील अणुंशी रिअ‍ॅक्शन होते. हे संवेदनशील रिसेप्टर्स सापाच्या मेंदूला संदेश पाठवून हा गंध उंदराचा आहे की इतर कोणत्या प्राण्याचा हे मेंदूला कळवतात. गंधामध्ये फरक ओळखणार्‍या संवेदनशील वेगळ्या पेशीही असतात. काही सरडे आणि सरपटणार्‍या प्राण्यांमध्येही जेकबसन नावाचा हा भाग आढळून येतो. त्यामुळेच हे प्राणी अनेकदा जीभ बाहेर काढून फुस्कारा सोडताना दिसतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news