‘या’ बेटावर आहे सापांचे राज्य!

‘या’ बेटावर आहे सापांचे राज्य!

रिओ डी जनैरो : जगाच्या पाठीवर अनेक प्रकारची बेटं आढळतात. त्यामध्ये 'सापांचे बेट' म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या एका बेटाचे वैशिष्ट भयावह आहे. ब्राझीलच्या समुद्र किनार्‍यापासून 90 मैल अंतरावर अटलांटिक महासागरात हे 'स्नेक आयलंड' आहे. छोट्या खडकांच्या या बेटामध्ये आजपर्यंत मानवी वस्ती वसवली जाऊ शकलेली नाही. याला 'लाहा डा क्विमाडा ग्रँड' किंवा 'स्नेक आयलंड' म्हटले जाते. या ठिकाणी पृथ्वीवरील सर्वात विषारी 'गोल्डन लान्सहेड' साप मोठ्या संख्येने आढळतो. ब्राझीलच्या साओ पावलो राज्यातील इटानहेम शहरातील महापालिकेकडून या बेटावर प्रशासन केले जाते.

असे म्हणतात, की या बेटावर प्रति मीटर क्षेत्रफळात 1 ते 5 गोल्डन लान्सहेड साप आढळतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, या विषारी सापाने चावा घेतल्यानंतर याचे विष शरीरात इतक्या जलदगतीने पसरते, की तो व्यक्ती काही वेळात मृत्युमुखी पडतो. हा साप झाडांवर चढून पक्षांची शिकार करतो. हे बेट केवळ 43 हेक्टर जागेचे आहे.

ब्राझीलमध्ये सर्पदंशाने होणारे 90 टक्के मृत्यू हे लान्सहेडच्या चाव्यानेच होतात. लाहा डा क्विमाडा ग्रँडमध्ये या सापांची वाढ जोमाने होते. हा साप अर्ध्या मीटरपेक्षा अधिक लांब असतो. ही प्रजाती खूप चपळ आणि शक्तिशाली आहे. तो शरीराच्या ज्या अवयवाचा चावा घेतो. तेथील मांस पसरते. ब्राझीलच्या नेव्हीने स्नेक आयलँडमध्ये लोकांना जाण्यास बंदी घातली आहे. हा साप जगातील सर्वात दुर्मीळ सापांमधील एक आहे. काळ्या बाजारात याचे विष खूप महागड्या भावात विकले जाते. एका गोल्डन लान्सहेडचे जवळपास 18 लाख (30,000 डॉलर) रुपयांचे विष निघते. त्यामुळे ब्राझीलच्या स्नेकलँडमधील या सापांच्या स्मगलिंगचाही मोठा धोका आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news