Volleyball match viral video: कोर्टवरची ‌‘स्लाईडिंग‌’ माफी झाली व्हायरल

जपानमधील कोबे येथे झालेल्या एका व्हॉलीबॉल सामन्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे
Volleyball match viral video
Volleyball match viral videoPudhari
Published on
Updated on

टोकियो : जपानमधील कोबे येथे झालेल्या एका व्हॉलीबॉल सामन्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जपानचा आघाडीचा व्हॉलीबॉलपटू युजी निशिदा याने दाखवलेली नम्रता आणि खेळाडूवृत्ती जगभरातील चाहत्यांची मने जिंकत आहे.

सामन्यादरम्यान 26 वर्षीय निशिदाचा एक सर्व्ह चुकून कोर्टच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या एका लहान मुलीला लागला. क्षणाचाही विलंब न करता निशिदा थेट कोर्टवरून स्लाईड होत त्या दिशेने गेला आणि पारंपरिक जपानी पद्धतीने ‌‘डोगेझा‌’ करत माफी मागितली. डोके खाली घालून, पूर्ण नम्रतेने मागितलेली ही माफी प्रेक्षकांना भावून गेली. या व्हिडीओला काही तासांतच दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एका यूजरने ‌‘ही खरी खेळाडूवृत्ती आहे, इतकी आपुलकी क्वचितच पाहायला मिळते,‌’ असे म्हटले.

दुसऱ्याने ‌‘फोल्डिंग खुर्चीसारखी त्याची हालचाल अप्रतिम होती,‌’ अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिली. तर आणखी एका यूजरने ‌‘संस्कृतीतून येणारी नम्रता किती प्रभावी असते याचे हे उत्तम उदाहरण,‌’ असे मत व्यक्त केले. युजी निशिदाची ही कृती केवळ एक माफी नव्हे, तर खेळात माणुसकी आणि संस्कार किती महत्त्वाचे असतात याचे सुंदर दर्शन घडवणारी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news