Cancer Risk | सतत बसून राहिल्याने वाढतो कर्करोगाचा धोका

Cancer Risk |
Cancer Risk | सतत बसून राहिल्याने वाढतो कर्करोगाचा धोका
Published on
Updated on

ग्लास्गो : दीर्घकाळ एकाच जागी सतत बसून राहणे हे आरोग्यासाठी नेहमीच्या निष्क्रिय वेळेपेक्षा कितीतरी पटीने अधिक घातक ठरू शकते. एका मोठ्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज दीर्घकाळ सतत बसून राहण्याच्या वेळेत प्रत्येक अतिरिक्त एक तासाची वाढ ही कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचा धोका ९ टक्क्यांनी वाढवते. दुसरीकडे, सतत बसून राहण्याच्या ऐवजी त्या एका तासात हलकी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम केल्यास कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचा धोका १२ टक्क्यांनी कमी होतो.

ग्लास्गो विद्यापीठाचे फ्रेडरिक हो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा संशोधन अभ्यास केला आहे. या अभ्यासात सतत दीर्घकाळ बसून राहण्याचा थेट संबंध केवळ कर्करोगाच्या मृत्यूशीच नाही, तर एकंदरीत कर्करोग होण्याच्या प्रमाणाशी आणि लठ्ठपणाशी संबंधित अनेक प्रकारच्या कर्करोगांशी आढळला आहे. यात अन्ननलिका, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, मोठे आतडे, स्तन, अंडाशय आणि थायरॉईडशी संबंधित कर्करोगांचा समावेश आहे. याउलट, जेव्हा सतत बसून राहण्याच्या वेळेत मध्येच ब्रेक घेऊन हलकी शारीरिक हालचाल केली गेली, तेव्हा अभ्यासात तपासलेल्या सर्व प्रमुख आरोग्याशी संबंधित धोक्यांमध्ये लक्षणीय घट दिसून आली.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमचे काम तासन्‌तास बसून करण्याचे असेल, तर दर तासाला काही मिनिटांचा ब्रेक घ्या, थोडे चाला किंवा हलके स्ट्रेचिंग करा. तुमच्या जीवनशैलीतील हा छोटासा बदल कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करण्यात अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news