सिंगापूर विमान दुर्घटनेचा धडा

सिंगापूर विमान दुर्घटनेचा धडा
Published on
Updated on

[author title="कॅप्टन नीलेश गायकवाड" image="http://"][/author]

लंडनहून सिंगापूरला जाणारे सिंगापूर एअरलाईन्सचे विमान हजारो फूट उंचीवर असताना अचानक जोरात हादरा बसला. त्यामुळे 73 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 70 हून अधिक प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे आकाशात कोणतेही ढग नव्हते, वादळ नव्हते, विजा चमकत नव्हत्या, द़ृश्यमानताही कमी झालेली नव्हती, इशाराही दिलेला नव्हता; मग आकाश स्वच्छ असताना हादरा कसा बसला? प्रवासी जखमी कसे झाले? सिंगापूर एअरलाईन्सच्या उड्डाणात सुमारे 70 लोकांनी सीट बेल्ट काढले होते आणि ते एका क्षेपणास्त्राप्रमाणे विमानाच्या छताला आदळले.

विमानांचे उड्डाण होण्यापूर्वी कर्मचारी सुरक्षा पाळण्याबाबत सूचना देतात. त्याचे पालन केले जातेच. उड्डाण करताना आणि विमान उतरताना सीट बेल्ट लावणे अनिवार्य असते; मात्र आता संपूर्ण प्रवासातच सीट बेल्ट वापरण्याची वेळ आली आहे. वाढत्या 'टर्ब्युलन्स'मुळे प्रवाशांना अधिक सजग राहावे लागणार आहे. याचे कारण अलीकडेच एका विमानातील धक्कादायक प्रकाराने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

लंडनहून सिंगापूरला जाणार्‍या सिंगापूर एअरलाईन्सचे विमान हजारो फूट उंचीवर असताना अचानक एअर टर्ब्युलन्समुळे विमानाला धक्के बसल्याने एका 73 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आणि 70 हून अधिक प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे आकाशात कोणतेही ढग नव्हते, वादळ नव्हते, विजा चमकत नव्हत्या, द़ृश्यमानताही कमी झालेली नव्हती, इशाराही दिलेला नव्हता; मग आकाश स्वच्छ असताना टर्ब्युलन्स कसा झाला? यामध्ये प्रवासी जखमी कसे झाले? आता यावर हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ काथ्याकूट करत आहेत. यादरम्यान, 22 मेच्या 'नेचर' नियतकालिकात एक अहवाल प्रकाशित झाला आहे. यात हवामान बदल हा विमानातील टर्ब्युलन्सची तीव्रता वाढवू शकतो आणि त्यामुळे प्रवाशांचा जीव जोखमीत राहू शकतो, असे म्हटले आहे.

20 मे रोजी उड्डाण घेणारे सिंगापूर एअरलाईन्सचे विमान एका धक्क्याने 1800 मीटर खाली अतिशय वेगाने आले. त्यामुळे प्रवासी आणि त्यांचे साहित्य विमानाच्या छताला धडकले. एअरलाईन्सच्या 24 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच घटना होती. ब्रिटनच्या रीडिंग युनिव्हर्सिटीतील वातावरणाचे अभ्यासक पॉल विलियम्स यांच्या मते, ही टर्ब्युलन्सची घटना विमान प्रवाशांना एखाद्या प्रोजेक्टाईलमध्ये परावर्तित करते. सीट बेल्ट न घालणार्‍या कोणत्याही व्यक्तीसाठी ही स्थिती कोणतेही नियम न पाळणार्‍या रोलरकोस्टरमध्ये बसण्यासारखा भयावह अनुभव देते.

विमान प्रवासातील टर्ब्युलन्स नवीन नाही. बहुतांश विमानांना टर्ब्युलन्सचा अनुभव येतोच. जमिनीजवळ, विमानतळाजवळ वेगाने वाहणारे वारे, उड्डाणाच्या वेळी किंवा उतरताना असे हादरे बसू शकतात. अधिक उंचीवर आणि वादळी पावसात हवेचा दोन्ही बाजूंकडील प्रवाह हा विमानाजवळून जाताना टर्ब्युलन्स किंवा गंभीर टर्ब्युलन्स निर्माण करू शकतो. म्हणून चक्रीवादळाची सूचना असेल तर उड्डाणे स्थगित केली जातात. पर्वतरांगांवरून जाणारे वारेदेखील टर्ब्युलन्स निर्माण करतात; पण या घटना वारंवार घडत नाहीत. अशा प्रकारच्या हवामानाच्या परिस्थितीचा विमान प्रवासात अपवादात्मक परिस्थितीत सामना करावा लागतो. वेगाने भ्रमंती करणारे वारे विमानाला धक्के देऊन जातात; मात्र कोणत्याही पावसाशिवाय होणार्‍या टर्ब्युलन्सला 'क्लीअर एअर टर्ब्युलन्स' म्हटले जाते. ताज्या घटनेत कदाचित तेथे वादळ येऊन गेले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हवामान बदलामुळे टर्ब्युलन्सच्या घटना अधिक गंभीर होत आहेत. जसजसे वातावरण उष्ण होईल, तसतसे स्वच्छ हवेत टर्ब्युलन्सच्या घटना आणखी गंभीर रूप धारण करत राहतील. हवेच्या, वार्‍याच्या दिशेमध्ये कधीही बदल होऊ शकतो. त्यामुळे विमानाला कोणत्याही बाजूकडून दाबाचा सामना करावा लागू शकतो आणि उड्डाणात बाधा येऊ शकते. अर्थात, टर्ब्युलन्सच्या प्रमाणात वाढ झाली तरी उड्डाणे सुरूच राहतील. सध्या टर्ब्युलन्सचा कालावधी दहा मिनिटांचा असला तरी तो भविष्यात वीस ते तीस मिनिटांचा राहू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news