‘तिने’ संग्रहालयात पाहिले स्वतःचेच काढलेले हृदय

‘तिने’ संग्रहालयात पाहिले स्वतःचेच काढलेले हृदय
Published on
Updated on

लंडन : कुणी एखाद्या संग्रहालयात ठेवलेले आपले हृदय 'याचि देही याचि डोळा' पाहील याची आपण कल्पनाही करणार नाही. मात्र, कधी कधी कल्पनेपेक्षाही आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. अशी एक संधी लंडनमधील हॅम्पशायरच्या रिंगवूडमधील एका 38 वर्षीय महिलेला मिळाली आहे. संबंधित महिला एका आजाराने त्रस्त होती. 16 वर्षांपूर्वी तिच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. यानंतर तिचे काढलेले हृदय आता एका संग्रहालयात ठेवण्यात आले आहे, जे पाहण्यासाठी ती महिला संग्रहालयात पोहोचली.

लंडनमधील हंटेरियन संग्रहालयामध्ये तिचे हृदय प्रदर्शनासाठी ठेवलेले पाहून महिलेला आनंद झाला. यावर महिलेने सांगितले की, हे तिच्यासाठी विश्वास ठेवू शकत नाही असे वास्तव आहे. या महिलेचे हृदय ट्रान्सप्लांट सर्जरीदरम्यान काढण्यात आले होते, तेच हृदय तब्बल 16 वर्षांनी संग्रहालयात पाहून महिला आश्चर्यचकीत झाली, शिवाय तिला आनंदही झाला. जेनिफर सटन असे या महिलेचे नाव असून तिने या माध्यमातून तिच्यासाठी ही सर्वात मोठी भेट असल्याचे म्हणत अवयवदानाला प्रोत्साहन देण्यात मदत होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. जेनिफर सटन ही एका विद्यापीठात शिकत होती. यावेळी तिला टेकड्यांवर चालताना हृदयाचा खूप त्रास होत होता, यावेळी तिने कार्डिओमायोपॅथीचे उपचार घेतले. ही शरीराची अशी स्थिती जी शरीरात रक्त पंप करण्याच्या हृदयाच्या क्षमतेवर परिणाम करते. या वेळी तिला सांगण्यात आले की, जर तिने हृदय प्रत्यारोपण केले नाही तर ती फार काळ जगू शकत नाही.

तिची तब्येत वेगाने खालावत होती, यावेळी हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत होती. अशा परिस्थितीत जून 2007 मध्ये तिला प्रत्यारोपणासाठी हृदय मॅच होण्याची खबर मिळाली. यानंतर जेनिफर खूप काळजीत होती कारण ती 13 वर्षांची असताना तिच्या आईचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. प्रत्यारोपणानंतर जेनिफरने म्हटले की, हे देवा, मला खरोखर नवीन जीवन मिळाले आहे. रॉयल कॉलेज ऑफ सर्जनला तिचे हृदय प्रदर्शित करण्याची परवानगी दिली. यानंतर ते हॉलबॉर्न संग्रहालयात प्रदर्शित करण्यासाठी ठेवण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news