Child Healthcare | लहान मुलांमध्ये अँटिबायोटिक्सला दाद न देणाऱ्या संसर्गात मोठी वाढ

नव्या अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष
child healthcare |
Child Healthcare | लहान मुलांमध्ये अँटिबायोटिक्सला दाद न देणाऱ्या संसर्गात मोठी वाढ
Published on
Updated on

वॉशिंग्टन : गेल्या २० वर्षांत लहान मुलांना होणाऱ्या जिवाणू संसर्गांवर (बॅक्टेरियल इन्फेक्शन) प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) निष्प्रभ ठरण्याचे म्हणजेच ‘अँटिबायोटिक रेझिस्टन्स’चे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

‘जामा पेडियाट्रिक्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात गेल्या दोन दशकांतील आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच, पुढील दशकात हे प्रमाण कसे बदलू शकते, याचा अंदाजही बांधण्यात आला आहे. या विश्लेषणानुसार, २०२५ पर्यंत ‘ॲसिनेटोबॅक्टर बॉमॅनी’ आणि ‘क्लेब्सीएला’ यांसारख्या सामान्य जिवाणूंमध्ये काही महत्त्वाच्या प्रतिजैविकांना दाद न देण्याचे प्रमाण कमालीचे वाढू शकते. जागतिक अंदाजानुसार, २०२१ मध्ये प्रतिजैविकांचा प्रभाव कमी झाल्यामुळे ५ वर्षांखालील ८,४०,००० बालकांना आपला जीव गमवावा लागला होता. जर हे प्रमाण असेच वाढत राहिले, तर हा मृत्यूचा आकडा आणखी भयानक रूप धारण करू शकतो. ऑस्ट्रेलियातील ‘मर्डोक चिल्ड्रन्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथील क्लिनिकल एपिडेमिओलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य संशोधक डॉ. यानहोंग जेसिका हू (अभ्यासाच्या

सहलेखिका) यांनी सांगितले की, ‘हे अंदाज केवळ धोक्याची सूचना देणारे आहेत, अंतिम निकाल नाहीत. जर आपण योग्य दिशेने ठोस पावले उचलली नाहीत आणि जुन्याच पद्धती सुरू राहिल्या, तर परिस्थिती अशी होऊ शकते.’ त्या पुढे म्हणाल्या की, जर आताच योग्य आणि मोठे उपाय केले गेले, तर हा धोका टाळता येऊ शकतो. प्रतिजैविकांना जिवाणू दाद न देणे (अँटिबायोटिक रेझिस्टन्स) या समस्येला अनेकदा ‘सायलेंट पॅंडेमिक’ (मूक साथ) म्हटले जाते. कारण, विषाणूंच्या प्रादुर्भावाप्रमाणे यावर तातडीने चर्चा होत नाही; पण हा एक अत्यंत गंभीर आरोग्यविषयक धोका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news