

न्यूयॉर्क : अमेरिकेतील कोट्यधीश कायल बेस अलीकडेच सोशल मीडियावर महागाईची तक्रार करत असताना बरेच ट्रोल झाले. कायल बेस न्यूयॉर्क शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरले होते. रूमवर त्यांनी ब्रेकफास्ट मागवला. यात डाएट कोक, ऑरेंज ज्यूस, वेफल व बेकनचा समावेश होता. नाश्ता रूमवर मागवल्याने त्याचा चार्ज वेगळा लावण्यात आला आणि टॅक्ससह बिलाची रक्कम 85 डॉलर्स अर्थात भारतीय चलनात 7 हजार रुपये इतकी झाली. मात्र, हे बिल त्यांना अजिबात रुचले नाही. त्यांनी हे बिल जरुर चुकते केले. मात्र, त्यानंतर त्या बिलाचा फोटो काढून त्यांनी ते सोशल मीडियावर पोस्ट केले.
आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, एनवायसी हॉटेलमध्ये केवळ एकट्याने नाश्ता करण्याचे बिल सात हजार रुपये! या बिलावर सही केल्यानंतर मी ठरवले आहे की, पुन्हा या हॉटेलमध्ये नाश्ता करणार नाही!
त्यांनी हे बिल सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांचे बरेच ट्रोलिंग झाले. पंचतारांकित हॉटेलमध्ये नाश्ता करत असताना इतक्या बिलाची कुरकूर करण्याचे काहीच कारण नव्हते, असे एका यूझरने नमूद केले तर अनेक यूजर्सनी त्यांचे बरेच ट्रोलिंग करण्यात काहीच कसर सोडली नाही.