वीस हातांचा , रंग बदलणारा जीव

वीस हातांचा , रंग बदलणारा जीव

न्यूयॉर्क : समुद्रांच्या अथांग दुनियेत अनेक रहस्यमय जीव आहेत. आता अंटार्क्टिक महासागरात शास्त्रज्ञांना एक भलामोठा जीव सापडला आहे. आजपर्यंत असा जीव कधीच पृथ्वीवर दिसला नव्हता. इतिहासात अशा जीवाचा कोणताही उल्लेख नाही. थंडगार पाण्यात सापडलेल्या प्राण्याची माहिती इनवर्टेब्रेट सिस्टमॅटिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. हा जलचर वीस हातांचा असून तो चक्क रंगही बदलू शकतो.

संशोधकांचे पथक 2008 ते 2017 मध्ये समुद्रातील रहस्यमयी जीवांचा शोध घेत होते. यावेळी शास्त्रज्ञांना एक महाकाय प्राणी सापडला. हा प्राणी समुद्रात 65 ते 65 हजार फूट खोलवर राहतो. हा प्राणी समुद्रात अन्य जगातून आलेल्या प्राण्यासारखा भासत असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले. महाकाय प्राण्याला 20 हात आहेत. पांढर्‍या रंगाचा हा प्राणी दिसायला स्ट्रॉबेरीसारखा आहे. त्याच्यात रंग बदलण्याची क्षमता आहे. तो आपला रंग बदलून जांभळा आणि गडद लाल करू लागतो.

शास्त्रज्ञांनी त्याच्या आकाराबद्दल नेमकी माहिती दिलेली नाही; पण हा प्राणी आकाराने अतिशय मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. स्ट्रॉबेरीसारखा दिसत असल्याने या प्राण्याला स्ट्रॉबेरी फेदर स्टार असे नाव देण्यात आले आहे. प्राण्याच्या शरीराची रचना आणि ठेवण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या खालील भूजा आकाराने लहान, धारदार आणि खडबडीत आहे. तर वरील भूजा मुलायम आहेत. त्याच्या शरीराचा खालील भागाचा आकार त्रिकोणी आहे. त्याच्या शरीराचा वरील भाग आकाराने मोठा आहे. शरीरावर वर्तुळासारख्या खुणा आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news