चंद्रावर आढळली मोठ्या आकाराची गुहा

Scientists find underground cave on moon
खगोलशास्त्रज्ञांनी चंद्रावर एका मोठ्या गुहेचा छडा लावला.Pudhari File Photo

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी चंद्रावर एका मोठ्या गुहेचा छडा लावला आहे. 55 वर्षांपूर्वी नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन ज्याठिकाणी उतरले होते, त्या ठिकाणापासून ही गुहा जवळच आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार याठिकाणी अन्यही शेकडो गुहा असू शकतात. त्यामध्ये भविष्यात अंतराळवीर आश्रय घेऊ शकतील.

चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत २०० पट अधिक किरणोत्सर्ग

चंद्रावर एक मोठी गुहा असल्याचे मिळाले पुरावे

इटालियन वैज्ञानिकांच्या एका टीमने सांगितले की, चंद्रावर एक मोठी गुहा असल्याचे पुरावे मिळाले आहेत. ‘अपोलो-11’ च्या लँडिंग स्थळापासून ही गुहा केवळ 400 किलोमीटर अंतरावरील ‘सी ऑफ ट्रँक्विलिटी’ याठिकाणी आहे. ही गुहा म्हणजे एक खोल खड्डा किंवा विवरच असून, ती यापूर्वी शोधण्यात आलेल्या 200 पेक्षा अधिक अन्य खड्ड्यांप्रमाणेच एक लाव्हा ट्यूब खचल्यामुळे निर्माण झाली होती. संशोधकांनी ‘नासा’च्या लूनार रिकनायसन्स ऑर्बिटरद्वारे रडार मोजमापांचे विश्लेषण केले आणि पृथ्वीवरील लाव्हा ट्यूबशी त्यांची तुलना केली. याबाबतच्या संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार ‘मारे ट्रँक्वॅलिटी’ नावाचा खड्डा हा चंद्रावरील सर्वात खोल खड्डा आहे. तो 45 मीटर रुंद आणि 80 मीटर लांबीच्या एका गुहेकडे जातो. ही गुहा चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 150 मीटर खोलीवर आहे. तिचे क्षेत्रफळ सुमारे चौदा टेनिस कोर्ट इतक्या आकाराचे आहे. इटलीच्या ट्रेंटो विद्यापीठातील लोरेंजो ब्रुजोन यांनी या गुहेला एक संभाव्य पोकळ लाव्हा ट्यूब ठरवले आहे.

चंद्रावर प्रत्यक्ष चालणार्‍या अंतराळवीरांची संख्या किती आहे?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news