चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत २०० पट अधिक किरणोत्सर्ग

न्यूयॉर्क : 'नासा'ने पुन्हा एकदा चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची तयारी केली आहे. 2024 मध्ये अमेरिकेची महिला अंतराळवीर चांद्रभूमीवर पाऊल ठेवेल. त्यावेळी या अंतराळवीरांना पृथ्वीच्या तुलनेत 200 पटीने अधिक किरणोत्सर्गाचा सामना करावा लागेल. आता प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावरील रेडिएशनबाबतची नवी माहिती समोर आली आहे. 

'सायन्स अ‍ॅडव्हान्सेज' या नियतकालिकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. चीनचे 'चेंग4' हे रोबोटिक अंतराळ यान 3 जानेवारी 2019 ला चांद्रभूमीवर उतरले होते. त्याने जर्मनीच्या लँडर न्यूट्रॉन अँड डोसिमेट्री उपकरणाच्या सहाय्याने तेथील रेडिएशनची तपासणी केली. या संशोधनात जर्मन एअरोस्पेस सेंटरचे अनेक संशोधक सहभागी झाले होते. त्यानुसार चांद्रभूमीवरील पृथ्वीच्या तुलनेत 200 पटीने अधिक किरणोत्सर्गाची माहिती समोर आली. असा किरणोत्सर्ग अंतराळवीरांच्या आरोग्यावर हानीकारक परिणाम सोडू शकतो. त्यामुळे त्यांच्या स्पेससुटबाबत विशेष काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे. या संशोधनानुसार अंतराळवीरांना रोज 1369 मायक्रोसेवर्टइतके सरासरी दैनिक किरणोत्सर्गाचा सामना करावा लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news