Saturn images | शनि ग्रहाची जेम्स वेब, हबल दुर्बिणींनी टिपली सर्वसमावेशक छायाचित्रे

Saturn images |
Saturn images | शनि ग्रहाची जेम्स वेब, हबल दुर्बिणींनी टिपली सर्वसमावेशक छायाचित्रेVanessa A Jewell
Published on
Updated on

वॉशिंग्टन : शनि ग्रह त्याच्या कड्यांसाठी प्रसिद्ध असला तरी, तेथील अशांत वातावरण, वेगवान वारे आणि अनेक वर्षे टिकणारी महाभयंकर वादळे शास्त्रज्ञांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिली आहेत. आता नासाच्या जेम्स वेब आणि हबल या दोन शक्तिशाली अंतराळ दुर्बिणींनी शनिची नवीन छायाचित्रे टिपली आहेत. नासाच्या मते, शनिचे आजवरचे हे सर्वात सर्वसमावेशक दर्शन आहे.

या दोन वेगवेगळ्या दुर्बिणींच्या प्रतिमांमुळे संशोधकांना शनिच्या वातावरणाचे विविध स्तरांवर सखोल विश्लेषण करणे शक्य झाले आहे. या फोटोंमध्ये शनिच्या उत्तर ध्रुवावर असलेला प्रसिद्ध ‘षटकोन’ स्पष्टपणे दिसून येत आहे. हा सहा बाजू असलेला एक प्रचंड जेट प्रवाह आहे. विशेष म्हणजे, 2040 सालापर्यंत या षटकोनाचे हे शेवटचे उच्च-गुणवत्तेचे फोटो असू शकतात. याचे कारण म्हणजे, शनिचा उत्तर ध्रुव आता पुढील 15 वर्षांसाठी अंधार्‍या हिवाळ्यात जाणार आहे. या अभ्यासातून शास्त्रज्ञांना ग्रहांच्या आकाराची महाकाय वादळे कशी निर्माण होतात आणि शनिची उत्पत्ती कशी झाली, हे समजण्यास मदत होईल.

ऑगस्ट 2024 मध्ये ‘हबल’ने शनिचे द़ृश्य-प्रकाश स्वरूपातील छायाचित्र घेतले, तर नोव्हेंबर 2024 मध्ये ‘जेम्स वेब’ने इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो काढला. या दोन्ही प्रतिमांमध्ये मोठा फरक दिसून आला. हबलची द़ृष्टी : यात शनी फिकट पिवळ्या पट्ट्यांमध्ये आणि चमकदार पांढर्‍या कड्यांसह दिसतो. जेम्स वेबची द़ृष्टी : इन्फ्रारेड प्रतिमेत शनिची कडी चमकदार निळ्या रंगाची दिसत आहेत, कारण ती प्रामुख्याने बर्फापासून बनलेली आहेत. तसेच, शनिचे ध्रुव करड्या-हिरव्या रंगात चमकताना दिसत आहेत, जे तिथल्या ‘ऑरोरा’ मुळे किंवा वातावरणातील कणांमुळे असावेत असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news