नागापेक्षाही जहाल विषारी साप!

नागापेक्षाही जहाल विषारी साप!
Published on
Updated on

जयपूर : भारतात 13 प्रजातींचे विषारी साप आढळतात. त्यापैकी इंडियन कोब्रा म्हणजेच नाग, रसेल व्हायपर (घोणस), सॉ-स्केल्ड व्हायपर (फुरसे) आणि क्रैट (मण्यार) हे चार साप अत्यंत धोकादायक असतात. पावसाळ्यात विविध विषारी प्राणी बिळांबाहेर येतात. त्यामुळे अंधार्‍या, ओलसर जागेत, नदीकिनारी साप, विंचू असे प्राणी आढळतात. राजस्थानच्या कोटा भागातील आवली रोजडीतल्या एका घरात मध्यरात्री सर्वजण साखरझोपेत असताना भारतातला सर्वात विषारी साप आढळला. मण्यार प्रजातीचा हा साप नागापेक्षा पंधरा पट अधिक जहाल विषारी असतो.

घरातील एक व्यक्ती रात्री पाणी प्यायला उठली. तिला गेटजवळ काहीतरी वळवळताना दिसलं. निरखून पाहिल्यावर साप असल्याचे लक्षात येताच ती घाबरली आणि जीव मुठीत घेऊन आतल्या खोलीत पळाली. आता जाताच सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्र गोविंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन येताच ते घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घरात 3 फूट लांब इंडियन क्रैट प्रजातीचा म्हणजेच मण्यार हा साप आढळला. हा साप चावल्यास वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कारण नागापेक्षाही तो अधिक विषारी असतो. मध्यरात्री येतो आणि व्यक्तीला झोपेतच डसतो. म्हणून त्याला 'सायलंट किलर'सुद्धा म्हणतात. हा साप मुख्यतः रात्रीच्या अंधारात बिळाबाहेर पडतो. व्यक्ती झोपेत असताना तिच्यावर हल्ला करतो.

महत्त्वाचं म्हणजे तो चावल्यावर केवळ डास चावल्यासारखं जाणवतं, मात्र त्याचं विष शरीरात झपाट्याने पसरून झोपेतच व्यक्तीचा मृत्यू होतो. म्हणूनच हा भारतातला सर्वात खतरनाक साप मानला जातो. तो दिसायला अतिशय सडपातळ आणि प्रचंड लांब असतो. त्याच्या काळसर शरीरावर दोन-दोन पांढरे पट्टे असतात. मण्यार साप प्रामुख्याने ग्रामीण भागात आणि जंगल परिसरात आढळतो. देशात घडणार्‍या सर्पदंशाच्या घटनांमध्ये सर्वाधिक याच सापाचा समावेश असतो. तो चावल्यानंतर 45 मिनिटांमध्ये व्यक्तीचा मुत्यू होतो. 6.5 फूट लांब असलेला हा साप साधारण 10 ते 17 वर्षे जगतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news