अंतराळ स्थानकाला जलसमाधी देणार ‘पॉईंट नेमो’

अंतराळ स्थानकाला जलसमाधी देणार ‘पॉईंट नेमो’
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला 2031 पर्यंत नष्ट केले जाणार आहे. त्याला पॅसिफिक महासागरातील ज्याठिकाणी जलसमाधी दिली जाईल त्याला 'पॉईंट नेमो' असे म्हटले जाते. हे पृथ्वीवरील सर्वात एकाकी स्थान असल्याचे म्हटले जाते. 'लोन्लीएस्ट प्लेस ऑन अर्थ' म्हणूनच ते विख्यात आहे. अत्यंत निर्जन असलेल्या याठिकाणीच अंतराळ स्थानक पाडले जाईल.

'पॉईंट नेमो' हे अत्यंत दुर्गम ठिकाण आहे. त्याच्यापासून सर्वात जवळच्या किनार्‍यावर जाण्यासाठीही 2700 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. हा किनाराही छोट्या छोट्या बेटांचाच असून, त्यावर केवळ पक्षीच राहतात! जगातील सर्वात मोठा महासागर म्हणजेच पॅसिफिक किंवा प्रशांत महासागर. त्याच्या मध्यभागी 'पॉईंट नेमो' हे ठिकाण आहे. ते ईस्टर आयर्लंडच्या दक्षिणेस आणि अंटार्क्टिकाच्या उत्तरेस आहे. तेथून सभोवार केवळ समुद्रच समुद्र दिसतो. त्याची खोलीही 4 हजार मीटर म्हणजेच 13 हजार फुटांची आहे. इतके दुर्गम व निर्जन ठिकाण असल्याने ते अंतराळ स्थानक पाडण्यासाठी सुरक्षित मानले जात आहे.

1970 पासून याच ठिकाणी सुमारे 300 निवृत्त अंतराळयाने, स्पेस स्टेशन्स, सॅटेलाईटस् पाडण्यात आले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून पृथ्वीभोवती फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला 2031 मध्ये अधिकृतरीत्या निवृत्त करून त्याला याच ठिकाणी जलसमाधी दिली जाईल. हे स्थानक 357 फूट लांबीचे आणि तब्बल 4,19,725 किलो वजनाचे आहे. त्यामुळे 'पॉईंट नेमो' मध्ये जलसमाधी मिळणारे ते आजपर्यंतची सर्वात मोठी वस्तू ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news