विमान उतरले गोठलेल्या नदीत!

विमान उतरले गोठलेल्या नदीत!

मॉस्को : पोलार एअरलाईन्सचे एक विमान पायलटच्या चुकीमुळे चक्क एका गोठलेल्या नदीवर उतरवण्याची अजब घटना घडली आहे. रशियाच्या पूर्वेकडे असलेल्या कोल्यमा नदीचा बराच भाग गोठला आहे. त्या नदीवर या पायलटने हे विमान नजरचुकीने उतरवले. यावेळी विमानात 30 प्रवासी व 4 एअरलाईन्स कर्मचार्‍यांचा समावेश होतो.

पूर्वाश्रमीच्या ट्विटर नेटवर्कवर या घटनेचे काही व्हिडीओ व छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. विमानतळाने या गोठलेल्या नदीवर लँडिंग केले, त्यावेळी त्याला गेलेले तडेदेखील काही छायाचित्रांत दिसून आले आहेत.

फ्लाईट वायएपी 217 ने साखा प्रजासत्ताकची राजधानी याकुत्स्क येथून उड्डाण केले आणि ते 1,100 किलोमीटर्स अंतरावरील झिरिंकाकडे कूच करत होते. हे विमान झिरिंका विमानतळावर पोहोचले असल्याचा दावा एअरलाईन्सतर्फे करण्यात आला. मात्र, 'बीबीसी'ने याबाबत वृत्त प्रसारित करत ते फ्लाईट गोठलेल्या नदीवर उतरवले गेले, त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news