आता भिंतीच्या पलीकडचेही दिसणार!

आता भिंतीच्या पलीकडचेही दिसणार!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेतील पेनसिल्व्हानियामधील कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी भिंतीपलीकडील मानवी हालचालींचा माग काढण्याचा एक सुलभ व कमी खर्चाचा मार्ग शोधला आहे. शास्त्रज्ञांनी वाय-फाय राऊटरच्या मदतीने भिंतीतून आरपार पाहण्याचे तंत्रज्ञान तयार केले आहे. या तंत्रज्ञानामुळे भिंतीच्या पलीकडे असलेल्या व्यक्तीचा थ्री-डी आकार तर दिसतोच, शिवाय त्याच्या पोझबद्दलदेखील माहिती मिळते.

याबाबतच्या शोधनिबंधात संशोधकांनी डीप न्यूरल नेटवर्कचा (डेन्स पोझ) कसा वापर केला आहे, हे स्पष्ट केले आहे. डेन्स पोझ तंत्रज्ञान वाय-फाय सिग्नलच्या मदतीने यूव्ही कार्डिनेट मॅपिंग करते. याचा वापर करून, थ्री-डी मॉडेल सर्फेस टूडी फोटोमध्ये प्रक्षेपित केला जातो. इम्पिरियल कॉलेज लंडन, फेसबुक एआय आणि युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधल्या संशोधकांनी हे डेन्स पोझ तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचाच वापर कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीतल्या शास्त्रज्ञांनी केला आहे. या प्रोजेक्टच्या मदतीने अनेक वस्तूंच्या पोझेस अचूकपणे मॅप करण्यात आल्या आहेत.

महागडे आरजीबी कॅमेरे, लायडर आणि याऐवजी हे नवीन तंत्रज्ञान अगदी स्वस्तात काम करू शकते. याबाबत संशोधकांनी सांगितले की, या संशोधनाच्या निष्कर्षातून असे दिसून आले आहे, की आमचे मॉडेल वाय-फाय सिग्नलच्या मदतीने अनेक गोष्टींच्या डेन्स पोझचा अंदाज लावू शकते. ही एक अतिशय स्वस्त आणि जास्त अ‍ॅक्सेसेबल पद्धत आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाचा वापर होम हेल्थकेअरमध्ये केला जाऊ शकतो. ज्या रुग्णांना कॅमेर्‍यांद्वारे मॉनिटरिंग नको असते, अशा ठिकाणी याचा वापर होऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news