आता ‘एआय’च्या सहाय्याने पहा हुकमी सुंदर स्वप्ने!

आता ‘एआय’च्या सहाय्याने पहा हुकमी सुंदर स्वप्ने!

वॉशिंग्टन : 'एआय' म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता कशासाठी होईल हे काही सांगता येत नाही. माणसाने डोके लढवून अनेक ठिकाणी 'एआय'ला आणलेले आहे. आता 'एआय'चा वापर करून अल्ट्रासोनिक हेडबँडही तयार करण्यात आला आहे. हा हेडबँड सुंदर स्वप्ने पेरण्याचे काम करील. 'ल्युसिड ड्रिम्स' पाहण्यासाठी हा बँड वापरला जाईल. 'ल्युसिड ड्रिम्स' म्हणजे अशी स्वप्ने जी पाहत असताना आपल्याला आपण स्वप्न पाहत आहोत याची जाणीव असते! आता हा बँड घालून आपण अशी स्वप्ने पाहू शकतो!

एका स्टार्टअपने या हेडबँडचे प्रोटोटाईप तयार केले आहे. तो घातल्यावर आपण नियंत्रित अशी स्वप्ने पाहू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. या उपकरणाला त्यांनी 'द हेलो' असे नाव दिले आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म 'मॉर्फियस-1'चा वापर केला आहे. हा बँड एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसवला की त्याला सुंदर स्वप्ने पाहता येऊ शकतील. केवळ इतकाच याचा उपयोग आहे असे नाही. त्याचा वापर जाणिवेचा तसेच स्वप्नांचा अभ्यास करण्यासाठीही होऊ शकेल.

'ल्युसिड ड्रिमिंग' ही एक अशी अवस्था असते, ज्यावेळी व्यक्तीला आपण स्वप्न पाहत आहोत अशी जाणीव असते. त्यामुळे तो अंशतः अशा स्वप्नांवर नियंत्रणही ठेवत असतो. भीतीदायक स्वप्नांवरील उपचारासाठी या स्थितीचा वापर करण्यात आलेला आहे. शिवाय लेखक, कलाकारांकडूनही सर्जनशीलतेसाठी अशा स्वप्नांचा वापर केला जात असतो. दिवास्वप्नांसारखी ही अवस्था पाहणे हे प्रशिक्षणप्राप्त कौशल्यही ठरू शकत असते. 'प्रोफेटिक' नावाच्या स्टार्टअपने आता हे 'द हेलो' उपकरण निर्माण करून अशा स्वप्नांना चालना दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news