आता एकाच मिनिटात फूल चार्ज होईल लॅपटॉप!

आता एकाच मिनिटात फूल चार्ज होईल लॅपटॉप!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : कारच्या प्रवासादरम्यान लॅपटॉप कसा चार्ज करावा, असा प्रश्न अनेकांच्या मनात फेर धरून नाचू लागतो. सध्या बाजारात अनेक इलेक्ट्रिक कारसुद्धा लाँच झाल्या आहेत. या गाड्यांना चार्जसुद्धा करावे लागते. तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉप केवळ एका मिनिटात, तर इलेक्ट्रिक कार फक्त दहा मिनिटांत चार्ज होणार आहे. भारतीय वंशाचे संशोधक अंकुर गुप्ता आणि त्यांच्या टीमने एक नवीन तंत्रज्ञान शोधले आहे, जे लॅपटॉप, मोबाईल फक्त एका मिनिटात; तर दहा मिनिटांत इलेक्ट्रिक कार चार्ज करून देणार आहेत.

'प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे की, संशोधकांनी शोधून काढले की, विद्युतभारित कण सूक्ष्म छिद्रांच्या नेटवर्कमध्ये कसे फिरतात. यूएसस्थित कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील रासायनिक आणि जैविक इंजिनिअरिंगचे साहाय्यक प्राध्यापक अंकुर गुप्ता यांच्या मते, या यशामुळे 'सुपरकॅपेसिटर'सारख्या अधिक प्रमाणात ऊर्जा साठवणार्‍या उपकरणांचा विकास होऊ शकतो.

अंकुर गुप्ता आणि त्यांच्या टीमने शोधलेलं हे तंत्रज्ञान केवळ वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये ऊर्जा साठवण्यासाठीच नाही, तर पॉवर ग्रिडसाठीही महत्त्वाचे आहे. जेथे चढ-उतार होणार्‍या ऊर्जेचे जलद वितरण होते. अंकुर गुप्ता म्हणाले की, सुपरकॅपॅसिटर, ऊर्जा साठवण उपकरणे त्यांच्या छिद्रांमध्ये आयन संग्रहावर अवलंबून असतात. तसेच यामध्ये बॅटरीच्या तुलनेत जलद चार्जिंग सपोर्ट आणि बॅटरी लाईफ जास्त असते, त्यामुळे अ‍ॅपलचा कार प्रकल्प रद्द केल्यानंतर यूएसमधील ईव्ही कंपनी 'रिवियन'बरोबर पार्टनरशिप करण्याचा विचार करत आहे.

संशोधकांच्या मते, सुपरकॅपॅसिटरचे प्राथमिक आकर्षण त्यांच्या गतीमध्ये असते. आयन हालचाली केवळ एका सरळ छिद्रात साहित्यात परिभाषित केल्या होत्या. हा शोध काही मिनिटांत हजारो परस्पर जोडलेल्या छिद्रांच्या नेटवर्कमध्ये आयन प्रवाह जलद करण्याची परवानगी देतो, असे संशोधकांनी नमूद केले. त्यामुळे आता स्मार्टफोन किंवा लॅपटॉपचे चार्जिंग संपल्यास तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही किंवा इलेक्ट्रिक कारची चार्जिंग करण्याचे टेन्शन तुम्हाला येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news