पर्यटनस्थळ नव्हे, रेल्वेस्थानक!

पर्यटनस्थळ नव्हे, रेल्वेस्थानक!
Published on
Updated on

अँटवर्प : ज्या-ज्या वेळी आपण एखाद्या रेल्वे प्रवासासाठी स्थानकावर पोहोचतो, त्यावेळी आपले सर्व लक्ष येणार्‍या रेल्वेकडे असते आणि एकदा रेल्वे पकडल्यानंतर ज्या स्थानकावर उतरायचे, तिथे सर्व नजर असते. पण, जगभरात काही रेल्वे स्थानक असेही आहेत, जिथे लोक फक्त रेल्वे पकडण्यासाठी नव्हे तर त्या रेल्वे स्थानकातील सुंदर नजारा डोळ्यात साठवण्यासाठी देखील जातात. बेल्जियममधील अँटवर्प सेंटर रेल्वे स्टेशनचा देखील यात आवर्जून समावेश आहे.

2014 पासूनच हे रेल्वे स्थानक जगभरातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. विविध माध्यमांनी या रेल्वे स्थानकाला सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांचा दर्जा बहाल केला आहे. अलीकडेच युरो न्यूजने देखील या स्थानकाचा विशेष उल्लेख केला आहे.
अनेक हॉलिडे साईटस्नी गौरवलेल्या या रेल्वेस्थानाचे उद्घाटन 1905 मध्ये करण्यात आले. 66 मीटर लांब व 44 मीटर उंच असणार्‍या या स्थानकाचे डिझाईन क्लेमेंटव्हॅन बागेर्ट यांनी केले. येथील वेटिंग रूमदेखील चर्चच्या कॅथेड्रलला साजेसे आहे. 1975 मध्ये या स्थानकाला ऐतिहासिक दर्जा बहाल करण्यात आला. पण, 1986 पर्यंत स्थानकाचे काम सुरूच होते. त्यानंतर हे रेल्वे स्थानक जगभरातील सर्वात लक्षवेधी ठरत आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news