बसने प्रवास करणारे राजा-राणी!

बसने प्रवास करणारे राजा-राणी!

ओस्लो : राजा-राणीचे नाव उच्चारले तरी विलासी, आलिशान राहणीमान, भव्यदिव्य राजवाडे, दिमतीला नोकरचाकरांचा ताफा, श्रीमंती मिरवणार्‍या आलिशान गाड्या, असे चित्र आपसूकच डोळ्यासमोर उभे राहील. पण, याला अपवाद म्हणून एक असेही राजा-राणी आहेत, जे इतका सारा शाही लवाजमा असताना देखील आजही केवळ बसनेच प्रवास करतात.

ही कहाणी नॉर्वेचे राजा हेराल्ड व त्यांची पत्नी सोन्जा यांची असून या उभयतांना सार्वजनिक परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करताना सातत्याने पाहण्यात येते. वास्तविक, राजा हेराल्ड व राणी सोन्जा यांना अनेक विशेषाधिकार आहेत. पण, यानंतरही ते जगभरातील सर्वात विनम्र शाही परिवारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. राजा हेराल्ड यांच्या कार्यकाळात नॉर्वेने आधुनिकीकरण व सुधारणा या दोन्ही आघाड्यांवर मोठी क्रांती घडवली आहे. याशिवाय, स्वत: केवळ बसनेच प्रवास करत त्यांनी आपलाच आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

बसने प्रवास करण्याबरोबरच ते आपल्या मुलांनादेखील सरकारी शाळेत पाठवतात. 86 वर्षीय राजा हेराल्ड यांनी आपली दोन मुले राजकुमारी मार्था लुईस व क्राऊन प्रिन्स हाकोन यांनाही हीच शिकवण दिली आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्राऊन प्रिन्स हाकोन यांनीही आपली कन्या राजकुमारी इंग्रिड अलेक्झांड्रा व प्रिन्स सेवर्रे मॅग्नसला सरकारी शाळेतच पाठवतात. राजा-राणीची एकूण संपत्ती 75 मिलियन पौंड इतकी आहे. पण, यानंतरही त्यांनी बसने प्रवास करत जपलेला साधेपणा आदर्शवत ठरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news