ना वर, ना वर्‍हाडी : जपानी तरुणींत ट्रेंड सोलो वेडिंगचा

ना वर, ना वर्‍हाडी : जपानी तरुणींत ट्रेंड सोलो वेडिंगचा

Published on

टोकिओ : कल्पना करा, असा एक विवाह ज्यामध्ये ना वर, ना वर्‍हाडी, ना बेंडबाजा, ना विवाहासंबंधीच्या विधी. तर तेथे असतो तो केवळ तरुणीच्या आवडीचा नववधूचा वेष, तिच्या मैत्रिणी, कुटुंबातील सर्व लोक, भरपेट जेवण आणि या सर्व कार्यक्रमाचे भरपूर फोटो. अशा विवाहात वधू स्वतःशीच विवाह करते. या विवाहास तेथे सोले वेडिंग असे म्हटले जाते. भारतात अशा विवाहाची कल्पना कोणच करणार नाही. मात्र, जपानमध्ये दशकभरापासून हा नवा ट्रेंड रूजू लागला आहे.

सोलो वेडिंगमध्ये जपानी तरुणी आपल्या पसंतीचा नववधूचा ड्रेस व रिंग घालते आणि स्वतःशीच आयुष्यभर राहण्याचे वचन घेते. अशा तरुणींना जीवनात कोणत्याच पार्टनरची आवश्यकता नसते आणि त्या आयुष्यभर एकट्याने राहण्यासाठी वचनबद्ध असतात.

जपानमधील बहुतेक तरुणी आता सोलो वेडिंगला प्राधान्य देत आहेत. या तरुणींना कोणासोबतही जीवन व्यतित करावयाचे नसते. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी नववधूप्रमाणे सजणे सोडले आहे. त्यांना आपल्या आयुष्यातील एक दिवस का होईना क्वीन बनावयास आवडते. सोलो वेडिंगची ही कल्पना जपानप्रमाणेच अन्य देशांच्याही तरुणी अंगीकारत आहेत.

जपानच्या क्योटो या शहरातील सेरेका ट्रॅव्हल नामक कंपनीने 2014 पासूनच शानदार सोलो वेडिंग पॅकेजेस जाहीर केली आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news