तरुणाच्या पोटातून काढली चक्क बाटली

तरुणाच्या पोटातून काढली चक्क बाटली

नवी दिल्ली : काहीवेळा डॉक्टरांना कोणकोणत्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील हे सांगता येणे अवघड आहे. याची प्रचिती नुकतीच आली. नेपाळमधील 26 वर्षीय तरुणाच्या पोटातून शस्त्रक्रिया करून चक्क वोडकाची बाटली काढण्यात आली आहे. याप्रकरणी एकास अटकही करण्यात आली आहे.

द हिमालयीन टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार रौतहट जिल्ह्यातील गुजरा नगरपालिका हद्दीतील रहिवासी नूरसाद मन्सूरी याच्या पोटात प्रचंड दुखत होते. यामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या पोटाची तपासणी करण्यात आली असता पोटात चक्क बाटली असल्याचे निष्पन्न झाले.

डॉक्टरांच्या पथकाने सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करून यशस्वीपणे बाटली काढली आणि नूरसादचा एकप्रकारे जीवच वाचवला. यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले की, बाटलीमुळे नूरसादच्या आतड्यांना दुखापत झाली होती; मात्र बाटली काढल्याने आता त्याच्या जीवाला कोणताच धोका नाही.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नूरसादला प्रथम दारू पाजली आणि त्याच्या पोटात बाटली घुसवली. याप्रकरणी पोलिसांनी नूरसादच्या मित्रांकडे चौकशी करून एकाला अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव समिम आहे. तसेच याप्रकरणी आणखी काही जणांचा शोध सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news