

न्यूयॉर्क : नकारात्मक भावना म्हणजे जीवनाचा सत्यानाश असे अनेकांना वाटते. लोक या भावनांना वाईट समजून टाळण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर यामुळे त्यांना दु:ख होते. वस्तुस्थिती तशी नाही. तुम्ही आव्हान म्हणून स्वीकारत असाल तर कधी-कधी नकारात्मक भावना तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यामुळे तुमचे मनही प्रसन्न होते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. वास्तविक, आपण आपले आयुष्य आणि कामामुळे कित्येकदा त्रासून जातो.
आपल्या भावनांचा आपल्या चांगल्या किंवा वाईट वर्तनावर प्रभाव पडतो. आपण आपल्या भावनांचा कसा वापर करतो आणि त्या कोणत्या पद्धतीने व्यक्त करतो याद्वारे जीवनात खूप फरक पडतो. इमोशन जर्नलमध्ये याच विषयावर प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये मानवी वर्तन आणि त्यातील भावना यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या संशोधनात हे स्पष्ट झाले की, जे लोक नेहमी दु:ख, भीती, राग आदी नकारात्मक भावनांनी वेढलेले असतात, त्यांना इतर लोकांपेक्षा जास्त चिंता आणि नैराश्यासारख्या प्रसंगांचा सामना करावा लागतो. असे लोक क्वचितच त्यांच्या सुखी जीवनातही समाधानी असतात.
संशोधनात असेही समोर आले आहे की, अनेकदा शरीरिक वाढीसह, त्यांच्या नकारात्मक भावनांना तोंड देण्याऐवजी, लोक त्यांना निरोगी आणि चांगले मानू लागतात. मात्र, त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात भावनांचा अभ्यास करणार्या सामाजिक मानसशास्त्रज्ञ आयरिस माऊस म्हणतात, आपल्यापैकी अनेकांना भावनांत गुंतत जाणे वाईट आहे, आणि भावना आपल्या मानसिक आरोग्यासाठी जबाबदार आहेत, असे वाटते. प्रत्यक्षात तसे नाही. बहुतेक वेळा भावना हानिकारक नसतात हे समजून घेतले पाहिजे.