‘नासा’ अवकाशात पाठवणार ‘टेम्पो’

‘नासा’ अवकाशात पाठवणार ‘टेम्पो’

कॅलिफोर्निया : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था मे महिन्यात अवकाशात 'टेम्पो' लाँच करणार आहे. हा 'टेम्पो' म्हणजे मालवाहतूक करणारे वाहन नव्हे. हा एक सॅटेलाईट असून, त्याचे पूूर्ण नाव 'ट्रोपोस्फेरिक एमिशन मॉनिटरिंग ऑफ पोल्युशन इंस्ट्रूमेंट' असे आहे.

'टेम्पो' नामक या उपग्रहामध्ये खास प्रकारची उपकरणे बसविण्यात आली आहेत. तो रोज दिवसाच्या वेळेला उत्तर अमेरिकेवरून जाणार आहे. तो प्रत्येकवेळी 10 चौरस कि.मी. परिसरातील वायू प्रदूषणाच्या पातळीची आकडेवारी पुरवणार आहे. या उपग्रहाची सीमा अटलांटिक महासागर ते पॅसिफिक महासागर आणि मध्य कॅनडा ते मेक्सिको सिटीपर्यंत आहे. या उपग्रहाचा आकार एखाद्या मोठ्या वॉशिंग मशिन इतका आहे. हा उपग्रह एअरोस्पेसने विकसित केला आहे. मॅक्सार नामक कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या 'इंटलसॅट 40 ई सॅटेलाईट'सोबत 'टेम्पो'ही लाँच करण्यात येणार आहे.

गेल्या 30 वर्षांपासून प्रदूषित हवा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठमोेठे कारखाने आणि वाहनांमधून बाहेर पडणार्‍या धुरांमुळे लोकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील वायू गुणवत्ता सूचकांकात सातत्याने सुधारणा होत असली, तरी अमेरिकेतील 40 टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत श्वास घेत आहे.

दरम्यान, येत्या मे महिन्यात सोडण्यात येणार्‍या 'टेम्पो' या उपग्रहावर प्रदूषणकारी 3 घटकांची आकडेवारी तयार करणे, हे मुख्य काम असेल. 'टेम्पो'चे प्रोग्राम शास्त्रज्ञ बॅरी लेफर यांनी सांगितले की, हा उपग्रह लाँच केल्यानंतर आम्हाला अमेरिकेतील प्रदूषणाच्या पातळीची योग्य आकडेवारी दर तासाने मिळणार आहे. यामुळे हवामान, आरोग्य आणि इतर समस्यांवर उपाययोजना अंमलात आणण्यास मदत मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news