‘वोलेमी पाईन’चे रहस्य उलगडले!

‘वोलेमी पाईन’चे रहस्य उलगडले!
Published on
Updated on

सिडनी : 1994 मध्ये काही गिर्यारोहकांना सिडनीच्या पश्चिमेला 100 किलोमीटर्स अंतरावर स्थित वोलेमी नॅशनल पार्कमधील काही दुर्मीळ झाडांचा शोध लागला होता. यातील एका गिर्यारोहकाने त्यावेळी त्या झाडाच्या पानाचे काही नमुने एका वनस्पती शास्त्रज्ञाकडे सुपूर्द केले आणि त्यानंतर ही पाने डायनॉसोरचे पृथ्वीवर वास्तव्य होते, तेव्हापासून अस्तित्वात असलेल्या प्राचीन झाडाचे असल्याचे संशोधनातून आढळून आले. त्याची काही रहस्ये आता उलगडली आहेत.

काहींनी याचा उल्लेख जिवंत जीवाश्म असाही केला. वोलेमी पाईन असे या वृक्षवलीचे नाव असून क्रेटासियस पिरियडमध्ये त्यांचे अस्तित्व होते असे मानले जाते. सध्या अशा प्रकारची केवळ 60 झाडे टिकून राहिली असून त्यांच्यासमोरही सातत्याने जंगलांना लागणार्‍या वणव्याचा धोका असतो, असे आढळून आले आहे. 2 दशलक्ष वर्षांपासून या वोलेमी पाईनचे अस्तित्व होते, असे मानले जाते.

आता, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व इटलीतील संशोधकांनी यावर एकत्रित संशोधन करत त्याची जनुकीय कुंडली, त्याचे मूल्यांकन व पुनरुत्पादक सवयी यावर प्रकाशझोत टाकला आहे. पाईनमध्ये 26 गुणसूत्र असतात. मात्र, त्यांची घटत चाललेली संख्या नेहमीच चिंतेची ठरत आली आहे. क्लायमेट चेंजसारखे व अन्य संलग्न घटक देखील यात कारणीभूत असू शकतात, असा संशोधकांचा होरा आहे. पायथोपथोरा सिन्नामोमी या पॅथोजेनिक वॉटर मोल्डमुळे देखील मोठा फरक पडले असल्याचे यात नमूद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news