UFO Sightings USA | अमेरिकेतील ‘या’ ठिकाणी येतात परग्रहवासी?

UFO Sightings USA |
UFO Sightings USA | अमेरिकेतील ‘या’ ठिकाणी येतात परग्रहवासी?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ‘एलियन्स’ म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही, याबाबत विज्ञानाने अद्याप मौनच बाळगलेले आहे; मात्र जगभरातून त्यांची अंतराळयाने समजल्या जाणाऱ्या ‘उडत्या तबकड्या’ (युफो) पाहिल्याचे सातत्याने दावे होत असतात. नुकताच अमेरिकेतून एक असा अहवाल समोर आला आहे, ज्याबाबतचे वास्तव पाहता काही सिद्धांतांवर आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने ‘पेंटागॉन’कडून ‘युफो’संदर्भातील गोपनीय माहितीचा तपशील जारी करण्यात आला आहे. या तपशिलामध्ये अमेरिकेतील अशा गोपनीय जागांची माहिती आहे, जिथे आभाळात अतिशय रहस्यमयीरीत्या लुकलुकणारे गोळे परतताना दिसतात आणि हे तारे नाहीहेत. कोणा सामान्य नागरिकाच्या दाव्यावरून नव्हे, तर एका ‘एफबीआय’ हेराच्या प्रत्यक्ष अनुभवानंतर ही माहिती समोर आली आहे.

‘पेंटागॉन’, ‘एफबीआय’ आणि ‘सीआयए’ने जारी केलेल्या ७२ फाईल्‍समधील माहितीनुसार, ही घटना ईशान्य अमेरिकेच्या दूरवर असणाऱ्या एका तलावापाशी घडली. या जागेचे नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले. २०२१ पासून या क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या एका नागरिकाने आभाळात सतत काही प्रकाश, लुकलुकणाऱ्या गोष्टी दिसत असल्याचे पाहिले. पुरावा म्हणून त्याने काही व्हिडीओसुद्धा चित्रित केले, शेअरही केले. ज्यामध्ये आकाशात चमकणारी वर्तुळे दिसत आहेत.

हवेत विखुरलेला हा उजेड एका क्षणाला दिसेनासाही होतोय. हे एलियन किंवा त्यांच्या उडत्या तबकड्या तर नाहीत? एलियन, परग्रहावरील हे जीव यांच्याबाबत आतापर्यंत बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या. त्यासंदर्भातील परीक्षणेसुद्धा झाली. मात्र, अमेरिकेतील हे एक असे ठिकाण आहे जिथे हा प्रकाश सातत्याने परतताना दिसला. २०२४ मध्ये एफबीआयचे एक पथक परीक्षणासाठी घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. अहवालात अधिकाऱ्यांनी नमूद केल्यानुसार त्यांनी स्वत: तिथे एक पांढरा उजेड पाहिला. जो दर दीड सेकंदात इथेतिथे दिसत होता आणि एकाएकी दिसेनासा झाला. यानंतर अचानक झुडपांमागे लाल आणि पांढऱ्या रंगाचा उजेड दिसू लागला, तो एका वर्तुळात फिरत होता आणि पुन्हा दिसेनासा झाला होता.

प्रत्यक्षदर्शींच्या अनुभवाचा उल्लेखही ‘पेंटागॉन’च्या या अहवालामध्ये आहे. जिथे लाल रंगाच्या वर्तुळाचा संदर्भ आढळतो, ज्याच्या केंद्रस्थानी बराच उजेड दिसला होता. एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी आपल्या जीवनात कधीच इतका गडद, सुरेख लाल रंग पाहिला नव्हता. त्या लाल वर्तुळासोबतच मागून एक पांढरे वर्तुळसुद्धा आले आणि ते प्रचंड वेगाने पुढे गेले. तपास अधिकाऱ्यांनुसार, या घटनांना ‘ट्रायंगल ऑर्ब्स’ किंवा ‘ऑर्बस ओव्‍हर द पॉन्‍ड’ अशी सांकेतिक नावे देण्यात आली आहेत. इतके व्हिडीओ आणि ‘एफबीआय’ अधिकाऱ्यांची माहिती असूनही अमेरिकी यंत्रणांना हे कोडे सोडवता आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news