Cat’s Head Nebula | ‘कॅटस्‌ हेड नेबुला’मध्ये दिसले गूढ आकार

वेब आणि हबल टेलिस्कोपने टिपले अद्‌भुत दृश्य
Cat’s Head Nebula |
Cat’s Head Nebula | ‘कॅटस्‌ हेड नेबुला’मध्ये दिसले गूढ आकार
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : अवकाशात तुमचा आवाज कोणीही ऐकू शकत नाही-किंवा मांजराच्या बाबतीत सांगायचे, तर त्याचे म्यांव सुद्धा! पॅरिसमधील ‘फेलीसिटे’ (Félicette) या भटक्या मांजरीने १९६३ मध्ये जगातील पहिली (आणि एकमेव) उप-कक्षीय मांजरीची अंतराळ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली होती, तेव्हापासून ते हबल आणि जेम्स वेब अंतराळ दुर्बिणींद्वारे टिपण्यात आलेल्या महाकाय ‘कॅटस्‌ हेड नेबुला’ (Cat's Head Nebula) च्या आश्चर्यकारक नवीन छायाचित्रांपर्यंत, हे सत्य आजही तसेच लागू होते. पृथ्वीपासून सुमारे ७,५०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या ढगाळ ‘कॅरिना नेबुला’ (Carina Nebula) मधून बाहेर पडणारा कॅटस्‌ हेड नेबुला हा वायू आणि धुळीचा एक असा स्तंभ आहे, जो पाहिला की एखादी मांजर पाठ करून बसली आहे आणि आपला एक लाल डोळा दाखवण्यासाठी तिने लाजत आपली मान फिरवली आहे, असा भास होतो. तो डोळा म्हणजे प्रत्यक्षात धुळीच्या थरांमध्ये गाडलेला एक तरुण तारा आहे, जो कदाचित आपल्या डोळ्यांसमोर त्या परिसराचे रूप बदलत आहे.

अशी तेजोमेळे (Nebulas) तेव्हा तयार होतात जेव्हा सक्रिय तरुण ताऱ्यांमधून येणारा प्रकाश त्यांच्या सभोवतालच्या पदार्थांना उजळून टाकतो आणि त्यांची झीज करतो. हे दिसायला अतिशय सुंदर आणि शोधायला सोपे असतात; समजा हा वैश्विक बिबट्या आपल्याकडे बघून कंटाळला, तर तो अगदी सहज कॅरिना नेबुलाच्या दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो आणि उघड्या झाकण असलेल्या खोक्यासारख्या दिसणाऱ्या वायूच्या गोळ्यात शिरू शकतो (कारण मांजरे शेवटी मांजरेच असतात!). हॅलोविनच्या (Halloween) निमित्ताने, युरियन स्पेस एजन्सीने (ESA) ‘कॅटस्‌ हेड नेबुला’चे तीन वेगवेगळे व्ह्यूज शेअर केले आहेत- एक हबल स्पेस टेलिस्कोपचा (जो दृश्य प्रकाश टिपतो) आणि दोन जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपवरील (JWST) इन्फ्रारेड उपकरणांचे.

घराच्या मागच्या बागेतील एका शक्तिशाली दुर्बिणीतून जशी नेबुला (तेजोमेघ) दिसू शकते, अगदी त्याच दृश्य तरंगलांबीमध्ये (visible wavelength range) या तेजोमेघाचे निरीक्षण करताना, हबल (Hubble) दुर्बिणीने धुळीच्या त्या गडद स्तंभाला प्रकाशात आणले आहे, जो जवळच्या ताऱ्यांच्या अतिनील किरणांच्या हल्ल्यातून बचावला आहे. या स्तंभाच्या उजवीकडील धुरकट कडा हे दर्शवतात की, ताऱ्याचा प्रकाश सभोवतालचा वायू कसा नष्ट करत आहे आणि हळूहळू तो शून्यात विरघळवत आहे. युरियन स्पेस एजन्सीच्या (ESA) मते, धुळीच्या या स्तंभाभोवती असणारा निळा, पिवळा, नारंगी आणि लाल रंगाचा प्रकाश हे दाखवतो की, ताऱ्याचा प्रकाश ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर यांसारख्या विविध वायूंच्या रेणूंशी कसा संवाद साधत आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया अगदी पृथ्वीच्या वातावरणातील विविध रेणूंनी सौर किरणोत्सर्गामुळे (solar radiation) उत्तेजीत होऊन वेगवेगळ्या रंगांचे ‘नॉर्दन लाईटस्‌’ (auroras) तयार करण्यासारखीच आहे- फरक फक्त एवढाच आहे की, हा प्रकार कैक पटीने मोठ्या प्रमाणावर घडतो. मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रकाशाकडे वळल्यास, JWST ची (जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची) ‘निअर-इफ्रारेड कॅमेरा’ प्रणाली धुळीच्या बाहेरील धुरकट थर भेदून स्तंभाच्या केंद्रातील सर्वात दाट सामग्री दाखवते. सभोवतालच्या पदार्थांमधून इन्फ्रारेड प्रकाश पलीकडे जात असल्याने, दृश्यात अगणित अतिरिक्त तारे आणि आकाशगंगा स्पष्टपणे दिसून येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.