ट्विटरवर मस्क यांनी ओबामांना टाकले मागे!

Twitter New Feature
Twitter New Feature
Published on
Updated on

वॉशिंग्टन : 'ट्विटर'ची मालकी मिळाल्यापासून एलन मस्क सतत 'ट्विटर'बाबतच चर्चेत असतात. आता ते ट्विटरवर सर्वात जास्त फॉलो केले जाणारे व्यक्ती बनले आहेत. याबाबत त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मागे टाकले आहे.

गेल्यावर्षी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर खरेदी करणारे अब्जाधीश एलन मस्क यांच्या फॉलोअर्सची संख्या ओबामा यांच्या 13 कोटी 30लाख 42 हजार 819 च्या तुलनेत आता 13 कोटी 30 लाख 68 हजार 709 इतकी झाली आहे. तसेच 113 दशलक्षपेक्षा अधिक ट्विटर फॉलोअर्ससह जस्टिन बीबर आणि 108 दशलक्षापेक्षा अधिक फॉलोअर्ससह केटी पेरी अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर आहेत. मस्क गेल्यावर्षी जूनमध्ये 100 दशलक्ष फॉलोअर्स मार्कपर्यंत पोहोचले होते आणि त्यावेळेपासून त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

दुसरीकडे ओबामा क्वचितच कधी ट्विट करतात. त्यांचे ट्विट हे प्रमुख सामाजिक कारणासाठी किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपण केलेल्या कामाची आठवण करून देण्यासाठी असते. मस्क मात्र जगभरात ट्रेंड होणार्‍या जवळजवळ सर्वच विषयांवर ट्विट करीत असतात. त्यांनी फेब—ुवारीत म्हटले होते की ते आपल्या ट्विटर अकाऊंटला हे पाहण्यासाठी खासगी बनवत आहेत की अशी बाब त्यांना वरच्या स्थानावर नेण्यासाठी मदत करते आहे का!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news