जगातील सर्वात महागडी मिठाई!

जगातील सर्वात महागडी मिठाई!

न्यूयॉर्क : ज्याप्रमाणे काहींना तिखट, चमचमीत खाणे विशेष आवडते, तसेच मिठाई हा देखील काहींचा वीक पॉईंट असतो. मिठाई कोणतीही असो, त्यावर तुटून पडण्यावर हे खवय्ये मागे पडणार नाहीत. मात्र, एक जगातील सर्वात महागडी मिठाई अशीही आहे, ज्या मिठाईचा आस्वाद घेणे हे सर्वांच्याच खिशाला परवडणारे अजिबात नसेल. कारण, या मिठाईची जी किंमत आहे, त्यातून एखादी आलिशान लक्झरी कार देखील सहजपणे विकत घेता येऊ शकेल!

आता खाणेपिणे हा वीक पॉईंट असलेले खवय्ये आपला हा शौक पूर्ण करण्यासाठी कुठेही जातील आणि कितीही पैसा खर्च करतील. पण, जगातील सर्वात महागड्या या मिठाईचा थाट थोडासा वेगळाच आहे. आता ही मिठाई आहे अमेरिकेतील फ्रोजन हाऊते चॉकलेट आईस्क्रीम संडे! आणि याची किंमत केवळ भुवया उंचावणारी नाही तर पायाखालची वाळू सरकवणारी देखील आहे!

न्यूयॉर्कच्या सेरेन्डिपिटी रेस्टॉरंटमधील या मिठाईचा आस्वाद घ्यायचा असेल तर थोडीथोडकी नव्हे तर 25 हजार डॉलर म्हणजे चक्क 20 लाख रुपये इतकी भरभक्कम रक्कम मोजावी लागते. या मिठाईला जगातील सर्वात महागडे 'डेझर्ट' म्हणून गिनिज बुकातही स्थान लाभले आहे.

ही सर्वात महागडी मिठाई 28 प्रकारची अतिशय प्रीमियम श्रेणीतील चॉकलेटच्या मिश्रणाने साकारली जाते. आता याची किंमतही 20 लाख रुपये इतकी भरभक्कम असल्याने ती एका सोन्याच्या कपमधून सजवली जाते आणि हा कप देखील हिर्‍याच्या ब्रेसलेटने मढवलेला असतो. आईस्क्रीमचा आस्वाद घेतल्यानंतर हा कप व हिरेजडित ब्रेसलेट आपण सोबत घेऊन जाऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news