जगातील सर्वात महाग स्ट्रॉबेरी!

जगातील सर्वात महाग स्ट्रॉबेरी!

टोकियो : जपानमध्ये अनेक महागडी फळे पाहायला मिळतात. त्यामध्ये सेकाई-इची अ‍ॅपल्स (सफरचंद), युबारी किंग मेलन (टरबुज), मियाझाकी मँगो (आंबा), डेन्सुके वॉटरमेलन (कलिंगड), रुबी रोमन ग्रेप्स (लाल द्राक्षे) यांचा समावेश होतो. आता तिथेच स्ट्रॉबेरीचीही एक महागडी प्रजाती विकसित करण्यात आली आहे. या प्रजातीमधील एक स्ट्रॉबेरी तब्बल 29 हजार रुपयांना विकली जाते!

या स्ट्रॉबेरीचे नाव 'बिजिन हाइम' असे आहे. आपला अनोखा आकार, रंग आणि चव यामुळे ती प्रसिद्ध झाली. जपानमध्येच उगवल्या जाणार्‍या या स्ट्रॉबेरीला 'ब्युटीफूल प्रिन्सेस' असेही म्हटले जाते. ही स्ट्रॉबेरी मिकियो ओकुदा नावाच्या जपानी शेतकर्‍याने विकसित केली. 45 वर्षे त्याने केवळ स्ट्रॉबेरीचीच लागवड केली.

पंधरा वर्षांच्या संशोधनानंतर त्याने ही 'बिजिन हाइम' प्रजाती विकसित केली. ही जगातील सर्वात महागडी स्ट्रॉबेरी ठरली! तिचे सर्वात मोठे फळ 100 ग्रॅमचे असू शकते. या स्ट्रॉबेरीमध्ये गोडवा अधिक असतो व आंबटपणा कमी असतो. ग्रीनहाऊसमध्ये तिचे उत्पादन घेतले जाते. लिलावादरम्यान या प्रजातीची एक स्ट्रॉबेरी 350 यूएस डॉलर्स म्हणजेच 29 हजार रुपयांना विकली जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news