जगातील सर्वात धोकादायक बीच!
नामिबिया : दक्षिण आफ्रिकन देश नामिबियात विस्तीर्ण पसरलेल्या 40 किलोमीटर रुंद व 500 किलोमीटर लांब तट क्षेत्राला जगभरातील सर्वात धोकादायक बीच असे ओळखले जाते. या बीचवर असंख्य हाडांचे सांगाडे, जहाजांचे अवशेष आणि विध्वंसक जंगली प्राण्यांमुळे या बीचवर ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जाते.
बिबटे, चित्ता, वाघ येथील वाळवंटात जागोजागी दबा धरून बसतात आणि संधी मिळताच क्षणाचाही अवधी न दवडता सावज टिपतात. यामुळे हा बीच अधिक धोकादायक बनला असल्याचे स्थानिक जाणकारांचे मत आहे. या बीचच्या बहुतांशी भागात केवळ प्रशिक्षित टुरिस्ट ऑपरेटच्या माध्यमातूनच पोहोचले जाऊ शकते. याचे कारण असे की, एकट्याने या बीचवर उतरणे निव्वळ धोक्याचे आहे.
हा समुद्र किनारा नॅशनल पार्क देखील दक्षिण व उत्तरी क्षेत्रात विभागला गेला आहे. यातील दक्षिणेकडील भागात सहज पोहोचता येते. स्केलेटन कोस्ट पार्क दक्षिणेकडील नॅशन वेस्ट कोस्ट रिक्रिएशन एरिया असून येथे मोठ्या प्रमाणात मासे आढळून येतात आणि यामुळे मच्छीमारांचे हे आकर्षण केंद्र आहे.
हकाई मॅगझिनमधील एका वृत्तानुसार, अधिकार्यांनी वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना पर्यटकांपासून दूर ठेवण्यासाठी पाणीसाठ्याची सुविधा उभी केली गेली आहे. त्याला जियोफेन्स नावाने ओळखले जाते.
या समुद्र किनार्याला जहाजांची सर्वात मोेठी स्मशानभूमी म्हणून देखील ओळखले जाते. याचे कारण म्हणजे थोडेथोडके नव्हे तर चक्क 500 जहाजांचे अवशेष येथे विविध ठिकाणी विखुरले गेले आहेत. ही जहाजे तुटण्याचे मुख्य कारण नेहमी खवळलेला व उथळ समुद्र हे आहे. इन्फो नांबियाच्या वृत्तानुसार, शतकभरापूर्वी येथे कित्येक जहाजे बुडाली आहेत आणि त्यामुळे हे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

