जगातील सर्वात सुंदर घोडा

जगातील सर्वात सुंदर घोडा

लंडन : जगात अनेक प्रजातीचे उमदे, सुंदर घोडे पाहायला मिळतात. मात्र एका प्रजातीचे घोडे असे आहेत जे जणू काही चांदीच्या मुशीतून घडवले गेले असावेत असेच त्यांच्याकडे पाहून वाटते. घोड्यांच्या या सुंदर प्रजातीचे नाव आहे 'अखल टेके'. हे घोडे तुर्कमेनिस्तानच्या कराकुम वाळवंटात आढळतात.

टेके आदिवासी समाजातील लोकांनी हजारो वर्षांपूर्वी अखल मरुस्थलात घोड्यांच्या या प्रजातीचे पालनपोषण केले होते. त्यामुळे त्यांच्यावरूनच या प्रजातीचेही नाव पडले. अखल टेके ही घोड्यांच्या जगातील सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक आहे. इतिहासात तीन हजार वर्षांपासून त्यांचा उल्लेख मिळतो. हे घोडे त्यांचा वेग, बुद्धी आणि शक्तीसाठी ओळखले जातात. इतकेच नव्हे तर हे घोडे अतिशय लांब उडीही घेतात. त्यांचा रंग चमकदार पांढरा किंवा सोनेरी असतो.

या एका घोड्याची किंमत भारतात 30 लाख रुपये असू शकते. त्यांचे वजन सरासरी 450 ते 500 असते. असे म्हटले जाते की हे घोडे केवळ त्यांच्या मालकांनाच सवारी करू देतात. या प्रजातीचे घोडे इतर घोड्यांच्या तुलनेत आपल्या मालकाचे बोलणे लगेच समजते. दुर्दैवाने सध्या या घोड्यांची संख्या घटत आहे. एका रिपोर्टनुसार या तुर्कमेनी घोड्यांची सध्याची संख्या सात हजारांच्या आसपास आहे. अखल टेके हे तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रीय प्राणीही आहेत. तेथील लोक हे घोडे पाळतात. वैज्ञानिकांचा दावा आहे की या घोड्यांच्या अनुवंशिकतेमुळे त्यांची त्वचा चमकदार असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news