

वॉशिंग्टन ः कधी कधी 'करायला गेलो एक आणि झालं भलतेच!' असे प्रकार घडत असतात. हल्ली लहान मुलांना शांत करण्यासाठी, त्यांच्या सततच्या तगाद्यापासून सुटका करवून घेण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल दिला जात असतो. मात्र, हाच मोबाईल मुलांसाठी आणि पालकांसाठीही डोकेदुखी बनून राहिला आहे. मोबाईलमुळे (Mobile Use) मुलं चिडचिडी होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
'मिशिगन मेडिसिन'मध्ये प्रकाशित एका अहवालानुसार, मुलांना शांत करण्यासाठी मोबाईल देणे, त्यांना मानसिक रुग्ण करू शकतो. यामुळे त्यांच्यात चिडचिड होते आणि अनेकदा आव्हानात्मक स्थितीत आक्रमक वर्तन करतात. यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली कमी होतात. दुसरीकडे, त्यांचे वर्तनही वाढत्या वयासोबत बदल घडतो. अशी मुले भावनात्मकद़ृष्ट्या खूप दुबळी होतात. याचा परिणाम बहुतांश मुलांवर दिसून येत आहे. जामा पीडियाट्रिक्स मिशिगन मेडिसिनच्या अभ्यासानुसार, 3-5 वर्षे वयातील मुलांना शांत करण्यासाठी स्मार्टफोन आणि टॅब्लेटसारखी उपकरणांचा वारंवार वापर मुलांमध्ये भावनात्मक विकृती निर्माण करू शकते.
स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्यांच्यात नकारात्मकता वाढते. यासोबत आव्हानात्मक स्थितीत त्यांचा प्रतिसाद वाईट होतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या शरीरात एक प्रकारची शिथिलता येते. मुलांचा मूड स्विंग होण्यास सुरुवात होते. अनेकदा खूप उत्तेजित होतात आणि अनेकदा चेहर्यावर उदासीनता दिसते. अशी लक्षणे दिसल्यास मुलांना मोबाईल देणे बंद करा. प्रमुख संशोधक रेडेस्की यांनी सांगितले की, मुलांना शांत करण्यासाठी अनेक पर्याय वापरता येतील. यातून त्यांच्या विकासात मदत मिळू शकते. उदा. झोका खेळणे, ट्रॅम्पोलिनवर खेळणे,चिखल खेळणे याद्वारे लक्ष वळवू शकता.
हेही वाचा