‘इथे’ दिसतो मध्यरात्रीचा सूर्य

‘इथे’ दिसतो मध्यरात्रीचा सूर्य
Published on
Updated on

ध्रुवीय परिसरात जे देश आहेत तिथे दिवस व रात्रीचे अनोखे खेळ पाहायला मिळत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर तिथे अनेक ठिकाणी सूर्यास्तही होत नाही. अनेक ठिकाणी अगदी मध्यरात्रीही आकाशात सूर्य दिसतो. अशाच काही ठिकाणांची ही माहिती…

अलास्का

अमेरिकेतील एक राज्य अलास्का हे आपल्या विस्तीर्ण मोकळ्या जागा, अलास्कन मूळ संस्कृती, चमकदार बर्फाच्छादित पर्वत आणि हिमनद्या यासाठी प्रसिद्ध आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून ते जुलैच्या अखेरीस अलास्कातील बॅरो या शहराला 24द्ब7 सूर्यप्रकाशाचा अनुभव येतो. यावेळी शहर खूपच सुंदर दिसते.

नॉर्वे

नॉर्वेला 'मध्यरात्रीच्या सूर्याचा देश' म्हटले जाते. येथे राहणार्‍या लोकांनी मध्यरात्री सूर्याचे आनंदी सौंदर्य बर्‍याचदा अनुभवले आहे. मे आणि जुलै दरम्यान सुमारे 76 दिवस येथे सूर्य मावळत नसल्यामुळे, मध्यरात्री सूर्याचे दर्शन करू इच्छिणार्‍या प्रत्येकाला भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

फिनलँड

फिनलँड हे नॉर्दर्न लाईटस्साठी एक आकर्षक पर्यटनस्थळ आहे. 'नॉर्दन लाईटस्'ला 'ऑरोरा' असेही म्हटले जाते. ज्यावेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला सौरकण धडकतात त्यावेळी ध्रुवीय प्रदेशातील अशा ठिकाणी आकाशात रंगीबेरंगी प्रकाशांचे झोत दिसून येतात. अशा 'नॉर्दन लाईटस्' सोबतच येथे मध्यरात्रीचा सूर्यही अनुभवण्याची शक्यता असते. कारण फिनलँडचे प्रदेश आर्क्टिक वर्तुळाच्या अगदी जवळ येतात.

स्वीडन

स्वीडनमध्ये सूर्य मध्यरात्री मावळतो आणि पहाटे पुन्हा उगवतो. इथे जवळपास चार महिने सूर्य कधीच मावळत नाही. स्वीडनमध्ये मध्यरात्री सूर्याचे साक्षीदार होण्याचा अनुभव जबरदस्त आहे आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी तो अनुभवला पाहिजे.

कॅनडा

युकॉन आणि नॉर्थवेस्ट टेरिटरीज आणि नुनावुत यांना कॅनडामधील 'मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी' म्हणून संबोधले जाते. पर्यटकांना येथे खूप मोठे दिवस आणि निसर्गरम्य ठिकाणे अनुभवण्याची संधी मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news