‘मायक्रो ब्रेक’ ठरतात लाभदायक!

‘मायक्रो ब्रेक’ ठरतात लाभदायक!
Published on: 
Updated on: 

[web_stories title="false" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

नवी दिल्ली : सध्याचे जीवन बहुतांश लोकांसाठी अतिशय धावपळीचे, ताणतणावाचे झालेले आहे. अशा धकाधकीच्या जीवनात घटकाभर विश्रांती घेणेही दुरापास्त बनले आहे. मात्र, कामात असतानाही थोडा वेळ 'ब्रेक' घेणे अनेक बाबतीत लाभदायक ठरते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संशोधनात आढळले आहे की लहान ब्रेक घेतल्याने तुम्हाला काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळते आणि थकवाही कमी होतो. जर तुम्ही काही तास काम करत असाल, तर त्यादरम्यान 10-15 मिनिटांचा मायक्रो ब्रेक घेणे महत्त्वाचे आहे. मायक्रो ब्रेक्सचा मुळात तुमच्या कामावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. जर तुम्ही काही कठोर आणि गंभीर कामात गुंतलेले असाल, तर अशा परिस्थितीत दीर्घ विश्रांतीचा देखील चांगला परिणाम होतो.

[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="ASC" orderby="post_date" view="list" /]

इरिना मॅक्सिंगा या तज्ज्ञाने सांगितले की, डिजिटायझेशन झाल्यापासून आमल्या कामात खूप फरक पडला आहे. कर्मचार्‍यांवरही मोठा ताण आहे. अशावेळी मायक्रो ब्रेकचे महत्त्व अधिक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या दरम्यान 10-10 मिनिटांचा ब्रेक घेता, तेव्हा त्याला 'मायक्रो ब्रेक' म्हणतात. लोक स्वेच्छेने ब्रेक घेतात जेव्हा त्यांना असे वाटते की काम पूर्ण करण्यासाठी नवीन ऊर्जा आवश्यक आहे. मायक्रोब्रेक अनेकदा तुमच्यामध्ये नवीन शक्ती निर्माण करतात, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर खूप परिणाम होतो.

जेव्हा तुम्हाला एखाद्या कामाचा कंटाळा येतो तेव्हा मायक्रोबेकर तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटतात. ते तुम्हाला एक नवीन उत्साह देतात. कामात रस टिकवण्यासाठी मायक्रोब्रेक देखील खूप महत्त्वाचा आहे. या ब्रेक्सचा तुमच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो. अनेक वेळा आपलं काम अधिक चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला काही खास टिप्स किंवा कल्पनांची गरज असते; पण सततच्या कामामुळे तुम्ही नवीन काहीही विचार करू शकत नाही. अशा स्थितीत, कामाच्या मध्यभागी मायक्रो ब्रेक घेतल्यास, आपण सर्व प्रकारच्या नवीन कल्पनांचा विचार करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news