Mental Health Awareness | मानसिक आरोग्य जपण्यासाठी...

Stress Management | सध्याच्या ताणतणावाच्या, धकाधकीच्या जगात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे ही एक मोठी गरज बनली आहे.
Mental Health Awareness
मानसिक आरोग्य जपण्यासाठी...(Pudhari File Photo)
Published on
Updated on

आपण आपल्या शारीरिक आरोग्याकडे जितके लक्ष देतो, तितके मानसिक आरोग्याकडे देत नाही. सध्याच्या ताणतणावाच्या, धकाधकीच्या जगात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे ही एक मोठी गरज बनली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात इतकी स्पर्धा, ताणतणाव आणि जबाबदार्‍या असतात की, आपण नकळत आपल्या मनावरचा भार वाढवत जातो. शारीरिक आरोग्यासाठी आपण व्यायाम, आहार आणि उपचारांकडे लक्ष देतो; पण मनाचे स्वास्थ्य मात्र अनेकदा मागे राहते. याच कारणामुळे मानसिक आजार आणि तणावाशी संबंधित समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत.

मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी 5 महत्त्वाची कारणे...

अतिरिक्त कामाचा ताण : नोकरी, व्यवसाय किंवा अभ्यासात यश मिळवण्यासाठी लागणारी धावपळ माणसाच्या मानसिक क्षमतेवर परिणाम करते. सतत कामाचा दडपणाखाली राहिल्यास मन थकून जाते.

वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष : नातेसंबंधातील मतभेद, कुटुंबातील जबाबदार्‍या किंवा वैयक्तिक समस्या या तणावाच ेमोठे कारण ठरतात.

सोशल मीडियाचा अतिरेक : सतत ऑनलाईन राहणे, इतरांशी तुलना करणे आणि अपडेट राहण्याची घाई, यामुळे मानसिक थकवा वाढतो.

एकटेपणा आणि संवादाचा अभाव : आजच्या जीवनशैलीत माणूस एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाही, ज्यामुळे मनातील ताण व्यक्त न होऊन आतच साचतो.

आर्थिक अस्थिरता : पैशांची चिंता, कर्ज किंवा नोकरीची असुरक्षितता हेदेखील मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे घटक आहेत.

Mental Health Awareness
Worlds Highest Shrikrishna Temple | जगातील सर्वाधिक उंचीवरील श्रीकृष्ण मंदिर

लक्षणे ओळखणे का महत्त्वाचे?

मानसिक आजाराची सुरुवात अनेकदा हळूहळू होते. सतत चिडचिड होणे, झोप न लागणे, उत्साह कमी होणे, अनावश्यक भीती, आत्मविश्वास घटणे ही काही सामान्य लक्षणे आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ही लक्षणे ओळखून उपाय करणे आवश्यक असते.

image-fallback
सुंदर दिसायचंय?

मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी उपाय

योग व ध्यान : दररोज काही मिनिटे ध्यान केल्याने मन शांत होते आणि विचारांवर नियंत्रण मिळते.

निसर्गसंगती : हिरवाईत वेळ घालवणे, सकाळच्या थंड वार्‍यात फिरणे, पक्ष्यांचे आवाज ऐकणे हे ताण कमी करण्यास मदत करते.

संवाद साधा : मित्र, कुटुंबीय किंवा तज्ज्ञांशी मनमोकळेपणाने बोलल्याने ताण हलका होतो.

डिजिटल डिटॉक्स : सोशल मीडियावरचा वेळ कमी करून स्वतःसाठी आणि आपल्या आवडीनिवडींसाठी वेळ राखून ठेवा.

संतुलित जीवनशैली : पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे मानसिक आरोग्य सुधारण्याचे आधारस्तंभ आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news