Russia Soldier Marriage Scam | रशियात मृत्यूपश्चात मिळणाऱ्या भरपाईसाठी सैनिकांशी लग्‍नाचा खेळ

एका नर्सने केले पाच जखमी सैनिकांशी लग्‍न!
Russia Soldier Marriage Scam |
Russia Soldier Marriage Scam | रशियात मृत्यूपश्चात मिळणाऱ्या भरपाईसाठी सैनिकांशी लग्‍नाचा खेळ
Published on: 
Updated on: 

मॉस्को : रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या चार वर्षांपासून भीषण युद्ध सुरू आहे. रोज दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिक या युद्धाच्या आगीत प्राणाला मुकत आहेत. मात्र, या भयानक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घोटाळा समोर आला आहे. युद्धात मारल्या जाणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या सरकारी भरपाईच्या रकमेवर दरोडा टाकण्यासाठी ‘बनावट लग्‍नां’चा खेळ मांडला गेला आहे, ज्याला ‘डेथ पेआऊट स्‍कॅम’ म्हटले जात आहे.

रशियन सरकार युक्रेन युद्धात मृत्युमुखी पडणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या कुटुंबाला ५० लाख रुबल (सुमारे ६२ लाख भारतीय रुपये) ची एकरकमी आर्थिक मदत देते. याशिवाय, विमा आणि इतर भत्ते मिळून ही रक्कम १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. याच मोठ्या रकमेच्या लालसेने काही महिला आणि गुन्हेगारी टोळ्या एकट्या, वृद्ध किंवा अशक्त सैनिकांना लग्‍नाच्या जाळ्यात ओढत आहेत. सैनिकाचा मृत्यू झाल्यास सर्व भरपाई कायदेशीर पत्नीला मिळते आणि त्याच्या मूळ कुटुंबाच्या हाती काहीच लागत नाही. अशा महिलांना रशियन प्रसारमाध्यमे आणि अधिकाऱ्यांकडून ‘ब्लॅक विडो’ असे संबोधले जात आहे.

एका लष्करी रुग्णालयातील नर्सने उपचारांसाठी दाखल झालेल्या तब्बल ५ वेगवेगळ्या जखमी सैनिकांशी गुपचूप लग्‍ने केली, जेणेकरून त्यांच्या मृत्यूनंतर मिळणारी कोट्यवधी रुपयांची भरपाई तिला हडपता येईल. सेंट पीटर्सबर्ग येथील मारिया यांच्या बाबतीत घडलेला प्रकार मन हेलावणारा आहे. युक्रेन युद्धात मारिया यांचे ५९ वर्षीय वडील युरी शहीद झाले. परंतु, युद्धावर जाण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांच्या वडिलांनी स्वतःपेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या एका अनोळखी महिलेशी गुपचूप लग्‍न केले होते, हे मारिया यांना वडिलांच्या मृत्यूनंतर समजले.

निसर्गाचा नियम आणि कायद्याचा आधार घेत वडिलांच्या हौतात्म्याची सर्व भरपाई त्या अनोळखी महिलेच्या खात्यात गेली आणि मूळ कुटुंबाला काहीच मिळाले नाही. हा घोटाळा केवळ महिलांपर्यंत मर्यादित राहिला नसून, यात रुग्णालय आणि लष्करातील अधिकाऱ्यांचेही संगनमत समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news