Actress Margot Robbie | अभिनेत्री मार्गो रॉबीच्या गळ्यात 80 कोटींचा ‘ताजमहल नेकलेस’

Actress Margot Robbie
Actress Margot Robbie | अभिनेत्री मार्गो रॉबीच्या गळ्यात 80 कोटींचा ‘ताजमहल नेकलेस’
Published on
Updated on

लंडन : प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आणि निर्माती मार्गो रॉबी सध्या तिच्या एका शाही नेकलेसमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या आगामी ‘वदरिंग हाईटस्’ चित्रपटाच्या प्रीमियरला ती एका अतिशय आकर्षक गाऊनमध्ये पोहोचली होती; परंतु सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते तिच्या गळ्यातील हिर्‍यांच्या ऐतिहासिक हाराने. हा हार चक्क भारताच्या मुघल इतिहासाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्याची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे! मार्गो रॉबीने परिधान केलेला हा हार ‘ताजमहल डायमंड नेकलेस’ म्हणून ओळखला जातो.

हा हार ‘जेड स्टोन’ पासून बनलेला असून, त्याला सोन्याची साखळी, माणिक आणि हिर्‍यांची जोड देण्यात आली आहे. या नेकलेसचे पदक हृदयाच्या आकाराचे आहे. हा हार एकेकाळी दिग्गज अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांच्या मालकीचा होता. त्यांचे वयाच्या 79 व्या वर्षी सन 2011 मध्ये निधन झाल्यानंतरही या हाराची चर्चा कमी झाली नाही. या शाही दागिन्याचा इतिहास थेट भारताच्या मुघल राजवटीशी जोडलेला आहे. या हारावर फारसी भाषेत ‘प्रेम अमर आहे’ असा संदेश कोरलेला आहे.

नेकलेसवर मुघल बेगम नूरजहाँ यांचे नाव कोरलेले आहे. असे म्हटले जाते की, मुघल बादशाह जहांगीर यांनी हा हार आपली पत्नी नूरजहाँ यांना भेट दिला होता. पुढे बादशहा शाहजहान यांनी त्यांची पत्नी मुमताज हिला हा हार भेट म्हणून दिला. मुमताजच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणीत ताजमहाल बांधला गेला आणि म्हणूनच या हाराला ‘ताजमहल डायमंड नेकलेस’ असे नाव पडले. मुघल राजवटीनंतर हा हार काही काळासाठी रहस्यमयरीत्या गायब झाला होता. मात्र, नंतर तो एका प्रसिद्ध लक्झरी ज्वेलरी ब्रँडकडे (कार्टियर) सापडला. 1972 मध्ये एलिझाबेथ टेलर यांच्या पतीने त्यांच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त हा हार त्यांना भेट दिला होता. 2011 मध्ये एलिझाबेथ टेलर यांच्या मालमत्तेचा लिलाव झाला, तेव्हा हा ऐतिहासिक हार तब्बल 80 कोटी रुपयांना विकला गेला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news