Chhaya Kadam : नाकात नथ, साडी नेसून अभिनेत्री छाया कदम पोहोचली Cannesमध्ये

Chhaya Kadam
Chhaya Kadam

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी आणि हिंदी अभिनेत्री छाया कदम हिने 'सैराट', 'फँड्री' आणि 'झुंड', 'गंगूबाई काठियावाडी', 'रेडू', 'लापता लेडीज' आणि 'न्यूड' यासारख्या अनेक चित्रपटात अभिनयाचा ठसा उमठवलाय. मात्र, तिची नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातील 'अम्मा'ची भूमिका खूपच गाजली. या चित्रपटात 'अम्मा'ची एक रस्त्याच्या कडेला डोसा बनवण्याचा गाडी असते. तिच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीपैकी 'सैराट' आणि 'लापता लेडीज' मधून तिला खरी लोकप्रियता मिळाली. आता फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर छाया कदम झळकली. यावेळी तिने परिधान केलेल्या आईची साडी आणि कानात नथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

मराठी अभिनेत्री छाया कदमविषयी 'हे' माहिती आहे काय?

  • छाया कदमने मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय साकारलाय.
  • दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री', 'सैराट', आणि 'झुंड' चित्रपटात ती दिसली.
  • दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी', 'रेडू', आणि 'न्यूड' या चित्रपट सर्वोत्कृष्ट काम केलं.

आईची साडी नेसून रेड कार्पेटवर

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री छाया कदम ही पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. मात्र, या खास सोह‍ळ्यासाठी तिने कोणतेही महागडे कपडे परिधान केलेले नव्हते. तर ती एकदम साध्या वेशभूषेत दिसली. छायाने या सोहळ्यात तिची दिवंगत आईची साडी आणि कानात नथ घालून रेड कार्पेटवर चारचाँद लावलेत. फ्रान्समध्ये त्या एकट्या गेल्या नाहीत तर त्याच्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टिम होती. सोनेरी व्हाईट कलरच्या साडीवर तिने जांभळ्या कलरचे ब्लॉऊज परिधान केलं होतं. केसांचा अंबाडा, त्यावर मोगऱ्याचा गजरा, कानात झुमके, न्यूज मेकपअने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. कान्समधील काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहेत.

विमानातून फिरवण्याचे स्वप्न अधुरे

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले….पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हलपर्यंत घेऊन जात आहे, याचे मला समाधान आहे. तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. Love you मम्मुडी आणि खूप खूप मिस यू", असे तिने लिहिलंय. यावरून छायाला तिच्या दिवंगत आईची आठ‍वण आल्याचे निदर्शनास येत आहेत. ही तिची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यत या पोस्टला ७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

छायाने साकारले चित्रपट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, छायाने मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. 'लापता लेडीज' चित्रपटात छाया 'मंजू माई' च्या भूमिकेत दिसली. यासोबत ती मराठी 'सैराट', 'फँड्री' आणि 'झुंड' आणि हिंदीत 'गंगूबाई काठियावाडी', 'रेडू', 'लापता लेडीज', 'मडगाव एक्सप्रेस' आणि 'न्यूड' यासारख्या चित्रपटात तिने भारदस्त अभिनय साकारलाय.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news