

पूर्वी गाजरे केवळ हिवाळ्यात मिळत असत; पण हल्ली ती वर्षभर बाजारात उपलब्ध असतात. अर्थातच गाजर खायला अनेकांना आवडतंही. गाजर विविध भाज्यांमध्ये किंवा सलाड म्हणून सर्व्ह केले जाते. शिवाय गाजरापासून हलवा, मिठाईही बनवली जाते. काही लोक दररोज गाजर खातात. रोज गाजर खाण्याचे अनेक फायदेही आहेत. त्याबाबतची ही माहिती...
यात व्हिटॅमिन-ए चे प्रमाण जास्त असते. हे डोळ्यांसाठी लाभदायक असते. गाजर चांगली द़ृष्टी राखण्यास आणि डोळ्यांच्या विविध समस्या कमी करण्यास मदत करते.
गाजर हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे अँटिऑक्सिडंट कर्करोग रोखण्यास मदत करते. त्यामुळे गाजर नियमितपणे खावे.
गाजर हृदयासाठीही चांगले असते. कारण अनेक घटक रक्तदाब नियंत्रित करतात. यात लाइकोपीनदेखील असते. तसेच हृदयासाठीही फायदेशीर आहे.
यात व्हिटॅमिन-सी देखील भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमी होते. जर तुम्ही गाजर नियमित खाल्ले तर ही समस्या कमी होईल.
गाजर पोट निरोगी ठेवते आणि पचनक्रिया सुधारते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे फायबर पोट निरोगी ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.
यामुळे चयापचय वाढण्यास मदत होते. त्यामुळे चरबी वेगाने वितळते. त्यामुळे गाजर नियमित खाणे फायदेशीर ठरते.
गाजरातील अनेक घटक त्वचेसाठी चांगले असतात. गाजर नियमित खाल्ल्यास त्वचा चमकेल आणि त्वचेचा कोरडेपणा दूर होईल.
गाजरातील अनेक घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. थंड हवामानात अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. गाजर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे.